"...साहेबांचे नादी लागू नको तुझा कार्यक्रम करू" 'अर्बन बँक बचाव'चे राजेंद्र गांधी यांना गाडी आडवी घालून धमकी; पोलिसांचा नंबर काढताच पंटर पळाला ! - Rayat Samachar

“…साहेबांचे नादी लागू नको तुझा कार्यक्रम करू” ‘अर्बन बँक बचाव’चे राजेंद्र गांधी यांना गाडी आडवी घालून धमकी; पोलिसांचा नंबर काढताच पंटर पळाला !

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर | प्रतिनिधी | २९

राज्यात प्रसिद्ध असलेल्या २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त अर्बन बँक लुटीच्या घोटाळ्याबाबत पाठपुरावा करणारे बँक बचाव समितीचे शिलेदार तथा माजी संचालक राजेंद्र गांधी यांना आज कटू अनुभव आला.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, श्री राजाभाऊ चोपडा यांचा वाढदिवस साजरा करून साधारण सांयकाळी ५ वाजता सथ्था कॉलनीचे गेटमधून बाहेर पडून मार्केटयार्ड चौकातील उड्डाणपूलाचे खाली रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबलो असता, मला पाठीमागून कोणीतरी शिवीगाळ करत असल्याचे जाणवले. म्हणून मागे वळून पाहिले तर एक धष्टपुष्ट व्यक्ति साधारण ४०/४५ वर्षांची असावी. अंगावर मळकट चॉकलेटी कलरचा शर्ट होता. मोटारसायकलवर माझे अगदी मागे आलेली होती. मी त्याला शिव्या का दिल्या असे विचारले असता तो विचित्र उत्तर द्यायला लागला. म्हणून मी त्याचा नाद सोडून रस्ता क्रॉस करून डॉ. आंबेडकर रोडवर आलो असता. त्या व्यक्तीने माझे गाडीला गाडी आडवी घालून पुन्हा शिवीगाळ करायला लागला व “आमचे साहेबांचे नादी लागू नको तुझा कार्यक्रम करू” असा म्हणायला
लागला.

हे वेगळे प्रकरण आहे असे माझ्या लक्षात आल्यावर मी मोबाइल बाहेर काढला व पोलीसांना फोन करणार होतो. हे पाहील्यावर मात्र ती व्यक्ति लगेच पळून गेली. मार्केटयार्ड चौकामध्ये पोलीस खात्याचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत त्यात ती व्यक्ती नक्की दिसेल. मी घाबरत नाही फक्त घडलेला प्रसंग शेअर केला आहे, असे गांधी यांनी सांगितले.

याबाबत ठेवीदारांनी गांधी यांना सांगितले की, आपण तात्काळ कोतवाली पोलिस स्टेशनला जावून तक्रार दाखल करावी. पोलिस त्या पंटरला पकडून चांगलाच बांबू घालतील व अशा प्रवृत्तीचा बिमोड करतील.

Share This Article
Leave a comment