खंडणीचा आरोपी भैय्या बॉक्सरच्या प्रोफाईलवर समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढेंचा फोटो; वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उठबस ? - Rayat Samachar
Ad image

खंडणीचा आरोपी भैय्या बॉक्सरच्या प्रोफाईलवर समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढेंचा फोटो; वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उठबस ?

अहमदनगर | प्रतिनिधी | २९

     भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार ॲड. भीमराव धोंडे यांना महिलांच्या नावे ब्लॅकमेल करून १ कोटी रूपये खंडणी मागत २५ हजार रूपये वसूल करणारा तथाकथित पत्रकार भैय्या बॉक्सर उर्फ इस्माईल दर्यानी यास कोतवाली पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर नेले असता. व्हिडिओ हस्तगत करण्यासाठी १ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

आरोपी पोलिस कोठडीत असताना त्याचा व्हाट्सअप फोन नंबर पाहिला असता. चक्क अहमदनगर जिल्ह्याचे सहा. समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्यासह प्रोफाईल फोटो दिसून येत आहे तसेच त्यासोबत लिहलेले आहे, ‘गर्वामुळे ज्ञानाचा, स्तुतीमुळे बुद्धीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो.!

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

छायाचित्राचे परिक्षण केले असता नविन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे छायाचित्र घेतलेले दिसून येत आहे. आरोपी जिल्हाभरातील वरीष्ठ अधिकारी यांच्यासोबत उठबस करत असल्याचे या प्रोफाईल फोटोवरून दिसून येत आहे. अनेकदा आरोपी जिल्हाधिकारी दालनाच्या आसपास दिसत असायचा.

व्हिडिओ पहा :

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment