पाथर्डी (राजेंद्र देवढे) १७.६.२०२४
माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी बकरी ईदचे औचित्य साधत, माजी नगरसेवक चांद मनियार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी, येथे उपस्थित असलेल्या मुस्लीम बांधवांशी संवाद साधत त्याच्या अडीअडचणी समजून घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दादाभाई चौधरी, अकबरभाई शेख, आरिफ कुरैशी, रफिक कुरैशी, लालाभाई शेख, जुनेद पठाण, तनविर आतार, मुन्ना खलिफा, जब्बार आतार, मुबीन शेख, कलंदर शेख, रहेमान शेख, रफिक शेख, बब्बू बागवान, फिरोज शेख, अस्लम फिटर, फिरोज मनियार, जब्बारभाई मनियार, बिलाल शेख, युनूस शेख, फारूक मनियार, शायद मनियार, निसार मनियार आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. दरवर्षी ईदगाह मैदानावर संपन्न होणारे नमाज पठण पावसामुळे मशीदीत करण्यात आले. बकरी ईद हा त्याग आणि समर्पणाचा सण असतो. त्याच भावनेने मुस्लीम बांधव हा सण साजरा करतात. या दिवशी अन्य धर्मीयांनाही जेवणाचे आमंत्रण दिले जाते. परंतु, आज सोमवार असल्याने अनेक जणांना सामिष भोजनाचा लाभ घेता आला नाही. ही दावत आठवडाभर चालत असल्याने उद्यापासून हिंदू बांधवांची, मुस्लीम बांधवांच्या घरांत रेलचेल सुरू होईल. रमजान ईद व बकरी ईदनिमित्त दरवर्षी सामाजिक ऐक्याचे प्रदर्शन होत असते. परंतु सोमवार असल्याने ते उद्यापासून सुरू होईल. सोमवार हा महादेवाचा वार असल्याने हिंदू धर्मात त्याला अनन्यसाधारण महत्त्व असून बहुसंख्य हिंदू या दिवशी मांसाहार करत नाहीत. त्यामुळे, यंदा आज फक्त शुभेच्छांची देवाणघेवाण झाली असून भोजनाची दावत उद्यापासून सुरू होईल.