अहमदनगर | भैरवनाथ वाकळे
राज्यभरात गाजलेल्या २९१ ते अंदाजे ४०० कोटी रूपयांच्या अर्बन बँक लूटीच्या तसेच भाजपा दिवंगत खासदार दिलीप गांधी शिल्पकार असलेल्या घोटाळ्यातील नवेनवे पैलू समोर येत आहेत. अर्बन बँक बचाव समिती व ठेवीदारांच्या चिवट पाठपुराव्यामुळे भ्रष्ट संचालक, नाठाळ कर्जदार यांची चांगलीच गोची झालेली आहे. ‘पैसे भरा तरच जामिन’ अशी भुमिका न्यायव्यवस्थेची असल्यामुळे हडपलेले पैसे भरावेच लागणार या भुमिकेत कर्जदार, संचालक आलेले असताना. अचानक, हे प्रकरण सखोलपणे पहाणारे आणि एमपीआयडीवर नियंत्रण ठेवून हाताळणारे न्यायाधिश शित्रे यांच्याकडून पुणे येथील जगप्रसिध्द बिल्डर सुशिल घनश्याम आगरवाल यांची केस काढून दुसऱ्या न्यायाधिशांकडे देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने अन्यायग्रस्त पिडीत ठेवीदार अस्वस्थ झाले आहेत.
अर्बन बँक बचाव समितीचे ॲड. अच्युत पिंगळे आणि पिडीत ठेवीदार विलास कुलकर्णी, धोंडोपंत कुलकर्णी यांच्यासह अनेक महिला ठेवीदारांनी आज अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश एस.व्ही. यार्लगड्डा यांची भेट घेतली.
त्यांना या ‘आर्थिक हिट ॲण्ड रन’ प्रकरणाची माहिती देत मागणी केली कि, या केसची संपुर्ण माहिती न्यायाधिश सित्रे साहेब यांना आहे. त्यांनी हे प्रकरण अत्यंत संयमाने न्याय्य बाजूने हाताळले आहे. त्यांच्याकडून पुणे येथील जगप्रसिध्द बिल्डर आगरवाल यांची थेट निकालावर असलेली केस काढून घेऊ नये, कारण या केसचा सर्व इतिहास न्यायाधिश सित्रे यांना माहिती आहे. आरोपींची मोडस ऑपरेंडी माहिती आहे आणि यातील सर्व बाजूंच्या सुनावणी झालेल्या आहेत. आता फक्त निकाल द्यायचा बाकी आहे. अशा वेळी नविन न्यायाधिशाकडे हे प्रकरण गेल्यास त्यांना केसची इत्यंभूत माहिती नाही. फटकन काही अन्याय्य निकाल दिला गेला तर पिडीत ठेवीदारांचे मोठे नुकसान होईल. पिडीतांमधे काहीजन कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे पेशंट आहेत. हेच पुण्याचे जगप्रसिद्ध आगरवाल बिल्डर न्यायालयात पैसे भरतो म्हणाले होते परंतु अद्यापही काहीच पैसे भरले नाहीत. त्यामुळे त्यांची केस नविन न्यायाधिशांकडे न देता ज्यांना या ‘आर्थिक हिट ॲण्ड रन’ चा इतिहास माहिती आहे त्यांच्याकडेच ठेवावी.
अशी विनंती न्यायाधिश एस.व्ही. यार्लगड्डा यांना केली असता बोलणारे इसम म्हणजे ॲड. पिंगळे व धोंडोंपंत कुलकर्णी पिडीत आहात काय? या अर्जावर आपल्या सह्या आहेत काय ? तसेच प्रकरण दुसऱ्या न्यायाधिशाकडे दिल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते? असे प्रश्न उपस्थित केले. तर आता जास्त न्यायाधिश असल्याने ही केस ट्रान्सफर केली, अशी माहिती दिली. यावर ट्रान्सफर करू करू नये, अशी मागणी व विनंती ॲड. पिंगळे व धोंडोपंत कुलकर्णी यांनी केली. यावर मुख्य न्यायाधीश यार्लगड्डा यांनी यावर दुपारी निकाल देतो म्हणाले.
ज्यांची निकालावरील केस ट्रान्सफर केली तो आरोपी पुण्यातील जगप्रसिद्ध कुटूंबातील सुशील घनश्याम अग्रवाल आहे. पुण्यात बीएमडब्लू वाहन विक्रीचे चार अलिशान शोरूम्स आहेत तर गगन बिल्डस्केप या नावाने मोठे मोठे इमारत बांधणीचे प्रकल्प आहेत. नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाशी संगनमत करून २०१६ साली ९.७५ कोटींचे कर्ज घेतले. कर्ज रक्कम इतरत्र वळवून बँकेची फसवणुक केली. घेतलेली रक्कम परत केली नाही, म्हणून फॉरेंसिक ऑडीटमध्ये आरोपी म्हणून निश्चित केलेले आहे.
हा जगप्रसिद्ध इसम सध्या कागदोपत्री फरार असून अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केलेला आहे. या अर्जावर आरोपीचे वकील, सरकार पक्षाचे वकील व ठेवीदारांचे वकील यांचे युक्तिवाद पुर्ण होवून आदेशकामी तहकूब झालेले कामकाज पुन्हा नव्याने नवीन न्यायाधीशासमोर चालविण्याचे आदेश संशयाचे भोवऱ्यात असल्याची पिडीत ठेवीदारांसह शहर व जिल्हाभर जाणत्या लोकांमधे चर्चा आहे.
आतापर्यत एकूण २५ आरोपींचे अटकपुर्व किंवा नियमित जामीन अर्ज फेटाळले गेल्याच्या पार्श्वभूमीवर फक्त एकाच प्रकरणाबाबत व ते देखील धनाढ्य अग्रवाल कुटुंबाबाबत हे जास्त गुढ आहे, असे पिडीत महिला म्हणत होत्या.