Divyang Vadhu Var Melava Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये दिव्यांग व मूकबधिरांसाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा - Rayat Samachar

Divyang Vadhu Var Melava Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये दिव्यांग व मूकबधिरांसाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | ०२.०९ | रयत समाचार

Divyang Vadhu Var Melava Ahilyanagar: ता. 30 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रहार करिअर अकॅडमी अहिल्यानगरच्या वतीने, “सर्व धर्मीय दिव्यांग व मूकबधिर बांधवांच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. प्रहार करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक संतोष पवार तसेच संचालक माजी सैनिक विनोदसिंग परदेशी यांच्या संकल्पनेतून या अभिनव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आदर्श सरपंच, पद्मश्री पोपट पवार (कार्याध्यक्ष – आदर्श गाव योजना) यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री पोपट पवार यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम समाजासाठी नक्कीच दिशादर्शक ठरतील आणि यातून सामाजिक बांधिलकी जपली जाऊन दिव्यांग व मुखबधिर व्यक्तींना सुद्धा सामाजिक स्थैर्य जपण्यास हा वधू वर परिचय मेळावा नक्की कार्य करेल, असे गौरवउद्गार व्यक्त केले.

या वधू वर परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातील दोन हजारापेक्षा जास्त तरुण युवा जोडप्यांनी आपली उपस्थिती दर्शवत, आपल्या जीवन साथीची निवड केली. यावेळी झालेल्या वधू वर परिचयानंतर कार्यक्रम स्थळीच १० हुन अधिक जोडप्यांनीं आपला जीवनसाथी निवडत एका नवीन जीवनाची सुरुवात केली.

- Advertisement -

एकीकडे समाजामध्ये सुदृढ युवकांचे आणि युवतींचे लग्न जुळणे कठीण असताना, सदर उपक्रम नक्कीच आशा दुर्लभ आणि समाजापासून दूर असणाऱ्या एका विशिष्ट वर्गासाठी आशेचा किरण ठरेल, असे प्रतिपादन प्रहार करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले.

Divyang Vadhu Var Melava Ahilyanagar

या कार्यक्रमासाठी श्री धनंजय कचाले (संचालक इग्नाइट अकॅडमी), प्रहार दिव्य क्रांती संघटनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते ज्यामध्ये धर्मेंद्र सातव (प्रदेशाध्यक्ष) तसेच रामदास खोत (महासचिव), शिवाजी गाडे (उपाध्यक्ष), मयूर काकडे (जिल्हाप्रमुख धाराशिव), लक्ष्मीताई देशमुख (जिल्हाप्रमुख अहिल्यानगर), सामाजिक कार्यकर्ते प्रा. हर्षल आगळे, समीना शेख, कल्पना दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोबतच ॲड. विजय राऊत, ॲड. लक्ष्मण पोकळे, पप्पू येवले, विजू भंडारे, नानासाहेब पारधे यांनी देखील कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग नोंदवाला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बडे यांनी तर सूत्रसंचालन हनुमंत महाराज यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. हर्षल आगळे यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रहार करिअर अकॅडमीचे पदाधिकारी व कर्मचारी यांनीही विशेष कष्ट घेतले.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading