नेप्तीत Sant Savta Maharaj पुण्यतिथीनिमित्त 3 दिवसीय हरिनाम सप्ताहास प्रारंभ; आकाश महाराज फुले यांचे प्रतिपादन

Sant Savta Maharaj: सावता महाराजांनी कामात देव शोधला – आकाश महाराज फुले; सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त 3 दिवसीय सप्ताहास प्रारंभ

rayatsamachar
3 Min Read
नेप्ती येथे संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन करताना आकाश महाराज फुले व उपस्थित मान्यवर... SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | रयत समाचार 

Sant Savta Maharaj: नगर तालुक्यातील नेप्ती येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. श्री संत सावता महाराज मंदिरात श्री संत सावता महाराज तरुण मंडळ, माळी समाज आणि नेप्ती ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ ऑगस्ट ते मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.

सप्ताहाचे उद्घाटन ह.भ.प. शिवचरित्रकार आकाश महाराज फुले यांच्या हस्ते वीणा पूजन करून करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, माजी सरपंच अंबादास पुंड, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, शाखाध्यक्ष शाहूराजे होले, प्राध्यापक एकनाथ होले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, मुख्याध्यापक बाबा भोर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, संतोष चौरे, गोरख फुले, प्राध्यापक भाऊसाहेब पुंड, पांडुरंग फुले, सिताराम बेल्हेकर, राजू फुले, पाराजी होळकर, रोहन देशपांडे, सिताराम शिंदे, अनिल चहाळ, आण्णा होळकर, अशोक रावळे, तुकाराम होले, सचिन पुंड, भोला नेमाने, रामातात्या होले, कैलास बेल्हेकर, तुषार भुजबळ, ओंकार भुजबळ, कैलास चौरे, बाबासाहेब चौरे, उत्तम फुले, तेजस नेमाने यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आकाश महाराज फुले म्हणाले, “संत सावता महाराजांनी केवळ भक्तीचा मार्ग सांगितला नाही, तर कष्ट, प्रामाणिकपणा आणि कर्माला भक्तीची जोड दिली. शेतात कष्ट करत असतानाही त्यांनी पांडुरंगाचे नामस्मरण सोडले नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनातून ‘कर्म हेच पूजन आणि प्रामाणिक कष्ट हीच खरी भक्ती’ असा संदेश समाजाला मिळतो.”
संत सावता महाराजांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करणारे आहेत. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात त्यांच्या विचारांची गरज अधिक आहे. “सावता महाराजांनी कामामध्ये देव शोधला,” असे प्रतिपादन आकाश महाराज फुले यांनी केले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सप्ताहामध्ये दररोज हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तन होणार आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत अनुष्का दिदी जाधव, ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था, नेप्ती यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. श्री. शंकर महाराज लोखंडे, कोल्हार खुर्द, गणेशवाडी यांचे कीर्तन होणार आहे.
मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. शिवचरित्रकार आकाश महाराज फुले यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आणि नेप्ती भजनी मंडळ यांची साथसंगत लाभणार आहे.
नेप्ती पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या ज्ञानयज्ञात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संत सावता महाराजांच्या विचारांचा आणि काल्याच्या कीर्तनानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी उपसरपंच जालिंदर शिंदे यांनी केले आहे.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading