पाथर्डी | ०३.०९ | पंकज गुंदेचा
Pathardi: पाथर्डी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विविध पदांवर निवड झालेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा राजर्षी शाहू महाराज पतसंस्था व समाधान आराख मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य तसेच पदोन्नती मिळालेल्या मान्यवरांचा गुणगौरव करण्यात आला. यामध्ये भारत गाडेकर यांची श्री तिलोक जैन विद्यालयाच्या उपप्राचार्यपदी, सुदाम मरकड यांची रत्न जैन विद्यालय, माणिकदौंडी येथील मुख्याध्यापकपदी, बाळासाहेब गागुर्डे यांची श्री तिलोक जैन विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी, देविदास सोनटक्के यांची भवानी माता विद्यालय टाकळी मानूरच्या प्राचार्यपदी, बिपीन खंडागळे यांची आनंद जैन विद्यालय (चिंचोंडी)च्या पर्यवेक्षकपदी आणि राजेंद्र सोनवणे यांची पाथर्डी तालुका क्रीडा समितीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

तसेच अशोकराव गर्जे आणि संजय राजगुरू यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सोसायटी, अहिल्यानगरचे संचालक शिवाजीराव लवांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिताराम ‘बापू’ बोरुडे होते.
या प्रसंगी वरिष्ठ साहित्यिक व कवी कैलास दौंड, हाजी हुमायून आतार, आत्माराम दहीफळे, बिपिन खंडागळे, अशोक गर्जे आणि देविदास सोनटक्के यांनी सादर केलेल्या सुंदर गीतांना उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यानंतर दिगंबर गाडे यांनी मनोगत व्यक्त करत सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रा. अशोक डोळस, अजय शिरसाठ, गौतम ढेकणे, आनंद पंडागळे, जावेद पठाण, जब्बार पठाण, कुळधरण, कर्नावट, अनिल दिनकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान आराख यांनी केले. सूत्रसंचालन कटारिया यांनी सुटसुटीत व सुंदर पद्धतीने केले, तर उपस्थितांचे आभार गणेश सरोदे यांनी मानले.
या सत्कार सोहळ्यास परिसरातील नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


