Savitribai Phule Pune University Ahilyanagar: वाळकीच्या 265 विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उप-परिसराला शैक्षणिक भेट - Rayat Samachar

Savitribai Phule Pune University Ahilyanagar: वाळकीच्या 265 विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उप-परिसराला शैक्षणिक भेट

प्रशासकीय कामकाजाची घेतली माहिती

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | ०१.९ | पंकज गुंदेचा

Savitribai Phule Pune University Ahilyanagar: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट येथील उप-परिसर् अहिल्यानगर येथे दि.31 ऑगस्ट रोजी वाळकी येथील न्यु इंग्लिश शाळेतील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील 265 विद्यार्थ्यांनी एकदिवशीय क्षेत्र भेट अंतर्गत संपूर्ण दिवसभर विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची जवळून माहिती जाणून घेतली. सर्व विद्यार्थी उत्सुकतेपोटी सर्व माहिती स्वतःहून घेत असल्याचे यावेळी दिसून आले.

उप-परिसर् अहिल्यानगरचे सहायक कुलसचिव डॉ.शिवप्रसाद घालमे यांनी उप-परिसर अहिल्यानगर स्थापन करण्याची पालक व विद्यार्थी यांची अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेऊन 1986 मध्ये नगरपालिकेच्या एका छोट्या गाळ्यात उप -परिसर स्थापन झाल्याचे सांगितले.

Savitribai Phule Pune University Ahilyanagar

- Advertisement -

तद्नंतर उप-परीसराचा विस्तार वाढत गेल्याने अधिकच्या जागेचा शोध घेऊन 2012 मध्ये बाबूर्डी घुमट येथील 83 एकर शासकीय जमिनीचे हस्तांतरण झाल्याने मे 2024 पासून येथील नूतन इमारतीमधूनच जिल्ह्यातील महाविद्यालयांचे विद्यापीठाशी समन्वय साधण्याचे काम होत आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बी. एससी. डाटा सायन्स हा चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू असून याचा परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच त्यांनी येथून सुरू असलेल्या प्रशासकीय कामकाजाची सविस्तरपणे माहिती दिली.

बी.एससी.डाटा सायन्स अभ्यासक्रमाचे सहायक प्राध्यापक डॉ.बी.के. थोरवे यांनी करिअर साठी बी. एससी. डाटा सायन्स हा उत्तम अभ्यासक्रम असल्याचे मनोगत व्यक्त केले.

Savitribai Phule Pune University Ahilyanagar

विद्यार्थ्यांनी कुतूहलापोटी विचारलेल्या सर्व प्रश्नांची विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ सहायक श्री.डी.एस.लोंढे,कनिष्ठ सहायक श्री.एस.एस.चोरमले व श्री.एस.जे.गीऱ्हे या कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहाने उत्तरे दिली.

विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसभर सर्व प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज,संगणक कक्ष,ग्रंथालय,विद्यार्थी सुविधा केंद्र,उत्तरपत्रिका गोदाम कक्ष व परीक्षा नियंत्रण कक्षातील कामकाजाची बारकाईने माहिती घेतली.

शाळेतील सर्व शिक्षकांनी क्षेत्र भेटीसाठी सहकार्य केल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.

- Advertisement -

शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत प्रा. पी.एस. मेटकर यांनी केले तर प्रा.गायत्री कर्पे यांनी आभार मानले.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading