Shikshak Bank | प्राथमिक शिक्षक बँकेच्या आदर्श कारभाराबाबत विरोधकांकडून सभासदांची दिशाभूल- राजेंद्र निमसे - Rayat Samachar

Shikshak Bank | प्राथमिक शिक्षक बँकेच्या आदर्श कारभाराबाबत विरोधकांकडून सभासदांची दिशाभूल- राजेंद्र निमसे

ऐक्य मंडळाचा आरोप

rayatsamachar
4 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | रयत समाचार 

Shikshak Bank: प्राथमिक शिक्षक बँकेच्या १०७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या कारभाराबाबत विरोधकांकडून शिक्षक सभासदांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रणित ऐक्य मंडळाने केला आहे. ऐक्य मंडळाचे संस्थापक नेते राजेंद्र निमसे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही भूमिका मांडली.

पत्रकानुसार, गुरुमाऊली-ऐक्य मंडळ आघाडीच्या कार्यकाळात शिक्षक बँकेत राष्ट्रीयकृत बँकांच्या धर्तीवर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सन २०२६ मधील बँकेचा निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सव्वा कोटी रुपयांनी वाढला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बँकेने शिक्षक सभासदांना कायम ठेवींवर ७ टक्के दराने व्याज अदा केले असून, यंदा ६.१० टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ऐक्य मंडळाच्या मते, शिक्षक बँकेला भविष्यात शेड्युल बँकेचा दर्जा प्राप्त झाल्यास रिझर्व्ह बँकेमार्फत स्वस्त दरात निधी उपलब्ध होण्याची शक्यता असून त्यामुळे कर्जावरील व्याजदर सुमारे ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

यासंदर्भात विरोधकांकडून अन्य जिल्ह्यातील शिक्षकांना सभासद करून त्यांना कर्ज वाटप केले जाईल किंवा भविष्यातील निवडणुकांमध्ये त्याचा राजकीय फायदा घेतला जाईल, असे आरोप करण्यात येत असल्याचा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे. मात्र हे आरोप वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचे ऐक्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार केवळ मंजूर कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांनाच सामान्य सभासद म्हणून स्वीकारण्याबाबत पोटनियमात दुरुस्ती प्रस्तावित आहे. तसेच शिक्षक बँकेत कोणतीही कायमस्वरूपी नोकरभरती करण्यात आलेली नसून, कार्यरत कर्मचारी मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत कंत्राटी स्वरूपात कार्यरत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले आणि जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर यांनी शिक्षक बँकेच्या विकासामुळे विरोधकांकडून निराधार आरोप करण्यात येत असल्याचा आरोप केला.

दरम्यान, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रणित ऐक्य मंडळाची पक्ष बैठक शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नगर जिमखाना, एमआयडीसी-नागापूर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर रणदिवे यांनी दिली.

तसेच रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या शिक्षक बँकेच्या १०७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षक बँकेचे संचालक कल्याण लवांडे, विकास मंडळाचे विश्वस्त राजेंद्र निमसे, ऐक्य मंडळाचे नेते बाळासाहेब कदम, शरद वांढेकर, सुनील शिंदे, विलास लवांडे, सुधीर बोऱ्हाडे, प्रदीप चक्रनारायण, सुरेश नवले, सुधीर रणदिवे, दत्तात्रय परहर, राजकुमार शहाणे, रामदास आव्हाड, शिवाजी ढाकणे, रज्जाक सय्यद, संजय थोरात, भाऊसाहेब घोरपडे, सजॅराव ससाणे, नितीन गायकवाड, लेविय तिजोरे, अविनाश जावळे, सुनील पठारे, बाळू शिंदे, संभाजी तुपेरे, बाबासाहेब डोंगरे, संदीप भालेराव, ज्ञानदेव कराड, बापूराव वावगे, बजरंग बांदल, लाजरस कसोटे, प्रकाश पटेकर, पांडुरंग देवकर, प्रवीण शेळके, संजय कांबळे, विनायक गोरे, नंदू गायकवाड, पांडुरंग झरेकर, लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, जनार्दन काळे, बाळासाहेब जाधव, शहाजी जरे, बथुवेल हिवाळे, सुखदेव डेंगळे, रविंद्र अनाप, शिवाजी माने, प्रताप कदम, राजेंद्र सोनवणे, सुनील कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता उदबत्ते, जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके, शिक्षक बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे, संगीता निगळे, मनीषा क्षेत्रे, नम्रता निमगावकर, सोनाली जाधव, मनीषा गोसावी आदींनी केले आहे.

Shrirampur Property Tax | विशेष शिक्षणकर व अग्निशमनकर पूर्ण रद्द; श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा, नगराध्यक्ष करण ससाणे यांची घोषणा


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading