अहमदनगर | रयत समाचार
(Education) रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी किरण अरूण कडू पाटील यांची निवड झाल्याने प्रवरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कडू कुटुंबाच्या कार्याचा हा सन्मान मानला जात आहे.
(Education) अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखा अडचणीत असताना कम्युनिस्ट विचारधारेवर चालणाऱ्या कडू पाटील कुटुंबाने मोठे योगदान दिले. संस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना स्वतःची मालमत्ता विकून त्या शाखा टिकविण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि ग्रामीण भागातील युवक घडावेत, या उद्देशाने त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.
(Education) विद्यार्थी घडवणाऱ्या आणि समाजाभिमुख शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीमध्ये किरण कडू पाटील यांची निवड होणे ही प्रवरा परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल दैनिक रयत समाचार परिवारासह विविध स्तरांतून अभिनंदन होत असून पुढील शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.



