श्रीगोंदा | ७.७ | माधव बनसुडे
(Rock Art Conservation) महाराष्ट्राच्या प्रागैतिहासिक सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा असलेल्या १० ते २० हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांच्या संवर्धनाला आता नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२६ मध्ये आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी हा महत्त्वपूर्ण विषय विधानसभेत उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. यावर राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने इतिहासप्रेमी, पुरातत्त्व अभ्यासक आणि वारसा संवर्धन क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
(Rock Art Conservation) आमदार विक्रम पाचपुते यांनी सभागृहात मांडलेल्या प्रश्नात महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक कातळशिल्पांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व अधोरेखित केले. या दुर्मीळ वारशाचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन, संरक्षण, दस्तऐवजीकरण आणि जनजागृतीसाठी शासन कोणती ठोस पावले उचलणार, याबाबत त्यांनी माहिती मागितली.
(Rock Art Conservation) चर्चेदरम्यान दिवंगत राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक स्व. विवेक वाघ यांनी त्यांच्या Neon Reels Creation संस्थेच्या माध्यमातून कातळशिल्पांवर तयार केलेल्या माहितीपटाचाही उल्लेख करण्यात आला. आगामी माहितीपटांच्या निर्मितीसाठी या माहितीपटाचा अभ्यास केला जाणार का, असा विशिष्ट प्रश्नही आमदार पाचपुते यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा : Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक
यावर उत्तर देताना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. स्व. विवेक वाघ यांच्या माहितीपटाचा अभ्यास करून भविष्यातील निर्मितीमध्ये त्याचा विचार केला जाईल. तसेच कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
शासनाच्या या भूमिकेमुळे राज्यातील प्रागैतिहासिक कातळशिल्पांच्या संशोधन, दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि पर्यटन विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. इतिहास अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक, सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार तसेच वारसा संवर्धनासाठी कार्यरत संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हे ही वाचा : India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?
तज्ज्ञांच्या मते, हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनशैली, कला, श्रद्धा आणि संस्कृतीची साक्ष देणारी कातळशिल्पे ही महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची महत्त्वपूर्ण ओळख आहेत. या वारशाचे वैज्ञानिक पद्धतीने जतन करून पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे.
विधानसभेत या विषयावर झालेली सविस्तर चर्चा आणि शासनाने दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भविष्यात कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी अधिक प्रभावी धोरणे आणि व्यापक उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महत्त्वाचे मुद्दे : विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कातळशिल्पांचा मुद्दा उपस्थित केला. १० ते २० हजार वर्षांपूर्वीच्या प्रागैतिहासिक वारशाच्या संरक्षणावर भर. स्व. विवेक वाघ यांच्या माहितीपटाचा शासन अभ्यास करणार. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक भूमिका जाहीर केली. संशोधन, संवर्धन, दस्तऐवजीकरण आणि पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा.
Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



