सोलापूर | ७.७ | रयत समाचार
(Muslim Marathi) जमीयत उलेमा-ए-हिंद, सोलापूर यांच्या वतीने ‘महाराष्ट्रातील मुस्लीम समाज आणि मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावर विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रा. डॉ. दीपक पवार मार्गदर्शन करणार आहेत.
(Muslim Marathi) हा कार्यक्रम बुधवारी ता. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता जमीयत उलेमा-ए-हिंद मशीद, रहमतबी टेकडी, पासपोर्ट कार्यालयाशेजारी, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
(Muslim Marathi) या संवादामध्ये महाराष्ट्रातील मुस्लीम समाजात मराठी भाषेचे स्थान, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तिचे महत्त्व तसेच भाषेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि मुख्य प्रवाहातील सहभाग या विषयांवर प्रा. डॉ. दीपक पवार मार्गदर्शन करणार आहेत.
जमीयत उलेमा-ए-हिंद, सोलापूरचे अध्यक्ष मौलाना हारीस ईशाअती, सरचिटणीस हाफिज महेमूद पटेल आणि जिल्हा सचिव हसीब नदाफ यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व उलेमा, मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते तसेच मराठी भाषा आणि सामाजिक प्रश्नांमध्ये रस असलेल्या नागरिकांनी या कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Image Alt Text:
Muslim Marathi सोलापूर येथे मराठी भाषेच्या महत्त्वावर मार्गदर्शन करणारे प्रा. डॉ. दीपक पवार
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


