Tree Plantation | हरित अहिल्यानगर अभियानाला वेग; हिवरगाव पावसा येथे 4 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प - Rayat SamacharHivargaon Pawasa Tree Plantation | हरित अहिल्यानगर अभियानांतर्गत ४ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

Tree Plantation | हरित अहिल्यानगर अभियानाला वेग; हिवरगाव पावसा येथे 4 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

Tree Plantation | हरित अहिल्यानगर अभियानाला वेग; हिवरगाव पावसा येथे ४ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
हरित अहिल्यानगर अभियानांतर्गत हिवरगाव पावसा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.SubEditor | Dipak Shirasath

संगमनेर | २३.६ | नितीनचंद्र भालेराव

ग्लोबल वॉर्मिंग, वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि वाढती पाणीटंचाई या गंभीर पर्यावरणीय संकटांवर प्रभावी उपाय म्हणून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले. हरित अहिल्यानगर अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे आयोजित वृक्षारोपण (Tree Plantation) कार्यक्रमात ते बोलत होते.

हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज

14 Trees Foundation, जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि हिवरगाव पावसा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित (Tree Plantation) वृक्षलागवड प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी देवगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आकर्षक वृक्षदिंडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचेही वृक्षदिंडीद्वारे उत्साहात स्वागत करण्यात आले.

हिवरगाव पावसा येथे हरित अहिल्यानगर अभियानांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या उपस्थितीत Tree Plantation

- Advertisement -
संगमनेर तालुक्यात ७७० हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले असून, 14 Trees Foundation च्या माध्यमातून खड्डे खोदणे, शेततळ्यांची उभारणी आणि आवश्यक पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. साकूर परिसरात १६ हजार वृक्ष, तर हिवरगाव पावसा येथे ४ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. (Tree Plantation) उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे भंडारी यांनी सांगितले.

 

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, 14 Trees Foundation चे व्यवस्थापक अनंत तायडे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, सरपंच तथा प्रशासक सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, ग्रामपंचायत अधिकारी गडाख, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, भाजपा जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे, वृक्षमित्र गणपत पावसे, भाजपा तालुका सरचिटणीस गणेश दवंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

तसेच प्रा. बाबुराव पावसे, वसंत नेहे, माने एम.ए., सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे, कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव, कृषी विस्तार अधिकारी सचितानंद पावसे, शिक्षण विस्तार अधिकारी वलवे मॅडम, केंद्रप्रमुख स्मिता धनवटे, शिक्षक संदीप पावसे, अक्षय खतोडे, डॉ. रमेश पावसे, गोकुळ गडाख, बाळासाहेब भालेराव, प्रवीण गडाख, सचिन आरगडे यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

वाढते तापमान, घटते पर्जन्यमान आणि पर्यावरणीय असंतुलन यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर व 14 Trees Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने हरित अहिल्यानगर अभियान राबविण्यात येत असून, संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जात आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading