मुंबई | २३.६ | गुरुदत्त वाकदेकर
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या Aditya Thackeray Birthday वाढदिवसाचे औचित्य साधत विभागातील नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी, चष्मा वाटप आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
शिवसेना शाखा क्र. २०७ आणि आरव आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने Aditya Thackeray Birthday निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नेत्रआरोग्याबाबत जनजागृती करणे, गरजूंना मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
Aditya Thackeray Birthday निमित्त शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी महिला शाखा संघटक प्रियांका प्रदीप टेमकर यांनी सांभाळली. यावेळी खासदार अरविंद सावंत, नगरसेवक रमाकांत रहाटे, पदाधिकारी विजय कामतेकर, हेमंत कदम, सुरेखा राऊत, चंदना साळुंखे, कीर्ती शिंदे, उषा पाटोळे, विजया वाळूज, स्वप्निल बागवे आणि मनीषा जाबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला शाखेतील आजी-माजी पुरुष व महिला पदाधिकारी, शिवसैनिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांनी या आरोग्यविषयक उपक्रमाचे स्वागत करत अशा समाजहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे शिबिर समाजोपयोगी उपक्रम म्हणून लक्षवेधी ठरले. नागरिकांच्या नेत्रआरोग्य संवर्धनासाठी आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आरोग्यसेवेच्या माध्यमातून शिवसेनेचा जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न; नागरिकांचा मोठा प्रतिसाद.
Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



