अहमदनगर | १४.६ | रयत समाचार
(Politics) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सिपीआय) महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या बैठकींची मालिका सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून १३ जून रोजी अहिल्यानगर जिल्हा कौन्सिलची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीसाठी राज्य केंद्रातर्फे पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे आणि कॉम्रेड राम बाहेती उपस्थित होते.
(Politics) राज्यभर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय बैठकींमध्ये जनसामान्यांच्या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात येत आहे. त्यानुसार ६ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरातील गावागावांत जनतेच्या प्रश्नांवर पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच १ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर भव्य राष्ट्रीय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
(Politics) याच पार्श्वभूमीवर १ ते ३० जून या कालावधीत ‘जनतेच्या दारी, संवाद घरोघरी’ ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच भारतीय खेतमजदूर युनियन (BKMU) तर्फे १५ ते २२ जून दरम्यान ‘मनरेगा बचाव, व्हीबी-ग्राम-जी भगाव’ ही देशव्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून २३ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि तहसील कार्यालयांवर मनरेगा मजूर, शेतमजूर, गायरान धारक आणि ग्रामीण कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील १०० प्राथमिक शाखांची शिबिरे आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसेच प्रगतिशील लेखक संघाच्या (प्रलेस) राज्य समितीने २५ व २६ जुलै रोजी अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला असून, या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी भाकप कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.
जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर संघर्ष तीव्र करण्यासाठी आणि ग्रामीण शहरी भागातील सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आगामी काळात विविध आंदोलनात्मक आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.




