Politics | इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये राज्यव्यापी निदर्शने; अमेरिका- इस्रायलच्या कारवाईविरोधात भाकपचा एल्गार

1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ८.३ | रयत समाचार

(Politics) अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवारी ता. ९ मार्च रोजी अहिल्यानगर येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजता मार्केटयार्डसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे हे आंदोलन होणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव ॲड. कॉम्रेड सुभाष लांडे यांनी दिली.

(Politics) अमेरिका आणि इस्रायल यांच्या साम्राज्यवादी धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्यभर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून नगरमधील हे निदर्शन त्याचा एक भाग आहे. जगाला युद्धाच्या खाईत लोटणाऱ्या या कारवायांचा तीव्र निषेध करण्यात येणार असल्याचेही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट केले.

(Politics) या निदर्शनामध्ये अहमदनगर शहर तसेच जवळील तालुक्यांतील कॉम्रेडस्, समविचारी संघटना, विविध संघटनांचे नेते व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. कॉ. सुभाष लांडे यांनी केले.

युद्धखोर साम्राज्यवादाविरोधात भारताने ठाम भूमिका घ्यावी आणि इराणवरील हल्ल्याचा निषेध करावा, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.

Share This Article