मुंबई | १४.६ | रयत समाचार
(World news) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत सातत्याने केलेल्या वक्तव्यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) तीव्र निषेध केला. भारताच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारने ठोस भूमिका घेतली नसल्याबद्दल भाकपने नाराजी व्यक्त केली.
(World news) मुंबई भाकपचे मिलिंद रानडे यांनी सांगितले, भारत आणि भारतीय नागरिकांचा अपमान सहन केला जाणार नाही. केंद्र सरकार या विषयावर गप्प बसले असले तरी भारतीय जनता गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
(World news) या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, भारतीय महिला फेडरेशन, ऑल इंडिया युथ फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ता. १५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील परळ येथील एफ/साऊथ कीर्ती महाल येथे निदर्शन आंदोलन आयोजित करण्यात आलेत.
या आंदोलनातून भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि नागरिकांच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
भाकप मुंबईचे सचिव कॉम्रेड मिलिंद रानडे यांनी नागरिक, कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांना या आंदोलनाची दखल घेण्याचे आवाहन केले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



