अहमदनगर | ४.६ | रयत समाचार
(Politics) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत संपूर्ण अहिल्यानगर शहर हिरवेगार करण्याच्या उद्देशाने ‘ग्रीन सिटी’ अंतर्गत भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या लोकचळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले. शुक्रवारी ता.५ जून २०२६ रोजी सकाळी ९:४५ वाजता न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मैदान, अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
(Politics) उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘ग्रीन सिटी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘१ वर्षात १ लाख वृक्षारोपण आणि संवर्धन’ हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
(Politics) साई द्वारका ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अनेक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये उंच देशी वृक्षांची रोपे, जेसीबीद्वारे खड्डे, माती परीक्षण, आवश्यकतेनुसार पोयटा, तांत्रिक मार्गदर्शन या सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत.
मात्र, या मोहिमेची एकच अट असून लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी संबंधितांनी स्वीकारायची.
युवक मंडळे, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक, सजग नागरिक, सोसायट्या, कॉलनी, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, संस्था, उद्योग, हॉस्पिटल, शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक जागांमध्ये वृक्षारोपण करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी तातडीने मागणी नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘आज एक झाड लावू या, उद्या हिरवेगार अहिल्यानगर घडवूया’ या संदेशासह पर्यावरण संरक्षणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
ग्रीन आर्मी कोअर कमिटीमध्ये उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, राजेंद्र पवार – 98502 16150, प्रा. हर्षल आगळे – 98223 35592, इंजि. प्रताप काळे – 88069 01111, ॲड. व इंजि. कैलाश दिघे -9822304881 यांचा समावेश असून नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
‘एक वृक्ष, अनेक पिढ्यांचे जीवन’ या संदेशासह पर्यावरण रक्षणासाठीची ही लोकचळवळ आता शहरभर पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
