मुंबई | ४.८ | गुरुदत्त वाकदेकर
जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधत दादर (पूर्व) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या राजा शिवाजी विद्यालयात मराठी साहित्य व कला सेवा संस्थेच्या वतीने ३१वे कविसंमेलन (Marathi Kavi Sammelan) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. साहित्य, मैत्री, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात कवी, साहित्यिक आणि रसिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
(Marathi Kavi Sammelan) कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित साहित्यिक, कवी आणि रसिकांना ‘मैत्रीचा धागा’ बांधून जागतिक मैत्री दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर मुक्त विषयावरील स्वरचित कविता, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना साहित्यिक अभिवादन तसेच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या साहित्याचे अभिवाचन अशा तीन स्वतंत्र सत्रांतून साहित्यिक मेजवानी अनुभवायला मिळाली.
मराठी साहित्य व कला सेवा ही संस्था सध्या आपल्या अकराव्या वर्षात कार्यरत असून गेल्या दशकभरात मराठी साहित्य, काव्य आणि कला क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. नवोदित आणि ज्येष्ठ साहित्यिकांना समान मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कविसंमेलनात (Marathi Kavi Sammelan) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विशेष साहित्यिक सत्रांचाही समावेश करण्यात आला.
यावेळी बालकवयित्री अजया, अदिती अजित नैराळे, अशोक सहदेव सुकाळे, कल्पना बालाजी उबाळे, कल्पना म्हापूसकर, कृपा राकेश म्हात्रे, डॉ. मानसी पाटील, प्रतिभा नवघरे, प्रिया प्रमोद दामले, मीरा वैद्य, विवेक वसंत जोशी, सरोज सुरेश गाजरे, मनोहर वाळिंबे आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. आचार्य अत्रे यांच्या साहित्याचे अभिवाचनही रसिकांनी उत्स्फूर्तपणे अनुभवले.
हे ही वाचा : Tukaram Abhang | संतवाणी : ‘संतां नाहीं मान’ तुकोबांच्या अभंगाचा खरा अर्थ !
कार्यक्रमाचे आस्वादन राकेश म्हात्रे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. मानसी पाटील यांनी केले. अल्पोपहाराची व्यवस्था राकेश म्हात्रे, कृपा राकेश म्हात्रे आणि अदिती अजित नैराळे यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक सहदेव सुकाळे, राकेश म्हात्रे, विवेक वसंत जोशी आणि मनोहर वाळिंबे यांनी विशेष सहकार्य केले.
मराठी साहित्य व कला सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमातून साहित्य, स्नेह, संवाद आणि सामाजिक सलोखा यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. संस्थेच्या वतीने पुढील कविसंमेलन ६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
📚🤝 जागतिक मैत्री दिनी दादरमध्ये साहित्य-स्नेहाचा सुंदर संगम! मराठी साहित्य व कला सेवेचे ३१वे कविसंमेलन उत्साहात संपन्न. अण्णाभाऊ साठे आणि आचार्य अत्रे यांना साहित्यिक अभिवादनासह अनेक कवींनी स्वरचित कविता सादर केल्या. #RayatSamachar #MarathiLiterature #KaviSammelan #Mumbai
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



