Politics | शेतकऱ्यांनी हक्क मागणं गुन्हा आहे का? – आ. रोहित पवार; पोलिसी बळाने ‘कांदा आंदोलन’ दडपण्याचा प्रयत्न

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नाशिक | २६.५ | रयत समाचार

(Politics) कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलकांवर अटकसत्र चालवून सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Politics

(Politics) कांदा आंदोलनासंदर्भात माहिती देताना रोहित पवार म्हणाले, आज सरकारने पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं हा गुन्हा झाला आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

(Politics) ते पुढे म्हणाले, आम्हाला अटक करून हा प्रश्न सुटला, असं सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे. १८ तारखेच्या शेतकरी आंदोलनानंतर सरकारला कांद्याच्या दरात ३ रुपयांची वाढ करावी लागली. आजच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असून मुंबईपासून दिल्लीपर्यंत हालचाली सुरू झाल्या आहेत. रोहित पवार यांनी पुढे सांगितले, उद्या दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांची बैठक होणार असून, हे शेतकरी एकजुटीचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.

Politics

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही लढाई इतक्यात संपणारी नाही. उद्याच्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही, तर शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन आणखी तीव्र करतील. हे सरकारला परवडणारे ठरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कांदा प्रश्नावर राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर असताना प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर येथे जाऊन प्रभू श्रीरामांचे मनोभावे दर्शन घेतले. सध्या राज्यातील शेतकरी अनेक संकटांचा सामना करत असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला यश मिळावे, तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदावी, अशी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना केली, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ.रोहित पवार यांनी दिली.

India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading