मुंबई | २६.३ | रयत समाचार
(Politics) राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतची अश्लील चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानीतील असून काँग्रेसने झिरवा यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कै.अजित पवारांचा राष्ट्रवादी चाणक्यांच्या निशाण्यावर असल्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
(Politics) तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत चित्रफितीमध्ये दिसतो. यादव याच्यावर मुंबईत खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची प्रसारित झालेली चित्रफीत सात महिन्यापूर्वीची आहे , असे कळते. यात शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती राष्च्रवादीचे झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर असून शेजारी खाद्य, मद्य आहे.
(Politics) या प्रकरणाची झिरवाळांना कल्पना होती. मंगळवारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. मंत्री पदासाठी काही इच्छुक असून त्यामधून झिरवाळ यांना लक्ष केले जात असल्याची पक्षामध्ये चर्चा आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांना मिळायला हवे, अशी मागणी करणारे झिरवाळ हे राष्ट्रवादीचे पहिले नेते होते. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्याचे अजित पवार यांनी ठरवले होते, असेही झिरवाळ यांनी जाहीर सांगितले आहे. त्यामुळे पेशवाई बारभाई कारस्थान करणाऱ्या चाणक्यांच्या टार्गेटवर कै. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची राज्यभर कुजबूज आहे.
चित्रफीत समोर आल्यावर झिरवाळ चर्चेत असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता दिसते. तसे झाल्यास धनंजय मुंडे, माणिक कोकाटे यांच्यानंतर मंत्रीपदावर पाणी सोडावे लागणारे झिरवाळ हे कै. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे तिसरे मंत्री असतील.
मंत्री नरहरी झिरवाळ यांची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित होणे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. झिरवाळ यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
या संदर्भात झिरवाळ यांच्या स्वीय सहायकांशी माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला असता, साहेबांना याप्रकरणी काही बोलायचे नाही, असे सांगण्यात आले.
दरम्यान, येत्या काळात कै.अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोणकोणत्या आमदारांची चाणक्यांकडून विकेट पडते, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे ही पहा : मराठी एक्स्प्रेस ची व्हिडीओ बातमी
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
