Crime | ‘गॉड’चे उलगडले गूढ; NEET पेपरफुटी प्रकरणाचा ‘गॉड’ तेजस शहा; सीबीआय तपासात धक्कादायक माहिती - Rayat Samachar

Crime | ‘गॉड’चे उलगडले गूढ; NEET पेपरफुटी प्रकरणाचा ‘गॉड’ तेजस शहा; सीबीआय तपासात धक्कादायक माहिती

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | २६.५ | रयत समाचार

(Crime) देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील पुण्यातील आरोपी मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘God’ नावाने सेव्ह असलेला मोबाईल नंबर प्रत्यक्षात तेजस शहा नावाच्या विद्यार्थ्याचा असल्याचे सीबीआयच्या फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झाले.

(Crime) या God नावाच्या नंबरवरून मोठ्या प्रमाणात संभाषण झाल्याचे तपास यंत्रणांना आढळले होते. त्यामुळे सुरुवातीला हा नंबर एखाद्या ‘गॉडफादर’चा, पेपरफुटी रॅकेटच्या सूत्रधाराचा किंवा यंत्रणेमधील प्रभावशाली व्यक्तीचा असावा, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र फॉरेन्सिक तपासानंतर हा नंबर एका विद्यार्थ्याचा असल्याचे समोर आल्याने प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.

(Crime) तथापि, हा नंबर God नावाने का सेव्ह करण्यात आला होता, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. प्रत्यक्षात हा मोबाईल नंबर तेजस शहाच वापरत होता की त्यामागे आणखी कोणी आहे, याचाही तपास सीबीआयकडून सुरू असल्याचे समजते.
तपास यंत्रणांच्या मते, या प्रकरणात अजूनही अनेक धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून पेपरफुटीचे मोठे आणि संघटित रॅकेट उघडकीस येऊ शकते. देशातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading