पुणे | २६.५ | रयत समाचार
(Literature) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२१ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदान करण्यात येणारा इतिहास विषयक ग्रंथासाठीचा मानाचे ‘रा.ना. नातू पारितोषिक’ यावर्षी लेखिका अस्मिता टिल्लू-हवालदार लिखित ‘विजयनगर शैलीचे लेपाक्षी’ या पुस्तकाला मिळाले. हे पुस्तक मिहाना प्रकाशन यांनी प्रकाशित केले.
(Literature) पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना लेखिका अस्मिता टिल्लू-हवालदार यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य करणाऱ्या मिहाना प्रकाशनाचे ऋतुपर्ण कुलकर्णी, अमृता कुलकर्णी, अंजली जोशी तसेच प्रकाशन संस्थेतील सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.
(Literature) हे पुस्तक त्यांनी कै. श्रीनिवास हवालदार यांना अर्पण केले असून, पुस्तक लेखन प्रक्रियेत लाभलेल्या श्रीकांत प्रधान आणि मंजिरी भालेराव यांच्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
‘विजयनगर शैलीचे लेपाक्षी’ या ग्रंथामध्ये विजयनगरकालीन स्थापत्य, कला आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यासपूर्ण वेध घेतला असून, इतिहास विषयक अभ्यासक आणि वाचकांकडून या पुस्तकाचे विशेष कौतुक होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या पुरस्कारामुळे पुस्तकाच्या शैक्षणिक आणि साहित्यिक मूल्याला आणखी अधोरेखित करण्यात आले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

