Ipl

World news | एपस्टीन’शी खोटा संबंध जोडल्याचा आरोप; हिमानी पुरी यांची उच्च न्यायालयात 10 कोटींची मानहानी याचिका

Google, X, Meta आणि LinkedIn यांना मजकूर हटविण्याचे निर्देश देण्याची मागणी

SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | १७.३ | रयत समाचार

(World news) रा.स्व.संघाच्या भाजपाचे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या कन्या हिमानी पुरी (Himani Puri) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली. काही सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावाशी कुख्यात एपस्टीन प्रकरणाचा खोटा संबंध जोडल्याचा आरोप केला.

(World news) याचिकेत म्हटले आहे, संबंधित पोस्टमध्ये हिमानी पुरी यांचा एपस्टीन (Epstin) किंवा त्याच्या कथित गुन्हेगारी नेटवर्कशी आर्थिक अथवा इतर कोणताही संबंध असल्याचे चुकीचे आणि दिशाभूल करणारे दावे करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे त्यांच्या प्रतिमेला गंभीर धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले.

(World news) या पार्श्वभूमीवर हिमानी पुरी यांनी रूपये १० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली असून Google, X (पूर्वीचे Twitter), Meta (Facebook/Instagram) आणि LinkedIn यांसारख्या प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्मना संबंधित बदनामीकारक मजकूर तात्काळ हटवण्याचे आदेश देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे.

- Advertisement -
Ad image

या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होण्याची शक्यता असून, सोशल मीडियावरील खोटी माहिती आणि मानहानीच्या प्रकरणांबाबत हा खटला महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share This Article