सोलापूर | २१.२ | रयत समाचार
(World news) सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन यांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक करून मोठी कामगिरी बजावली. लाओस येथे वास्तव्यास राहून आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर रॅकेट चालवणारा ग्लेन (अल्बर्ट) पर्सी सिक्वेरा (वय ४७, रा. पलावा सिटी, डोंबिवली) याला लुक आऊट नोटीसच्या आधारे ९ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
(World news) २०२४ साली अंदाजे ६३ लाखांची गुंतवणूक फसवणूक सायबर पोलीस स्टेशन गुन्हा क्र. 04/2024 अन्वये भादंवि कलम 420, 419, 34 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (C) (D) अंतर्गत 4 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादींना ऑनलाईन संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये १० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यातून तब्बल ६२ लाख ६५ हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये व डिजिटल करन्सी (USDT) वॉलेटद्वारे वळवण्यात आले.
(World news) तपासात खात्यांमध्ये AL Hareem Hajij Umrah Services खात्यात १६.६० लाख रूपये. Blackseed Solutions and Service खात्यात १०.३९ रूपये व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून ही रक्कम डिजिटल करन्सीद्वारे परदेशात ट्रान्सफर करण्यात आली.
मुख्य आरोपी सिक्वेरा हा २०२२ पासून लाओस येथे वास्तव्यास होता. तेथे ‘टिचर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या चायनीज फसवणूकदारासोबत संगनमत करून विविध देशांतील युवकांना ऑफिस बॉय व डेटा एंट्री नोकरीच्या आमिषाने परदेशात बोलावले जात होते. परदेशात पोहोचल्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त करून जबरदस्तीने ऑनलाईन फसवणुकीचे काम करून घेतल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली.
नोटीस बजावूनही आरोपी हजर न झाल्याने २०२४ मध्ये त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. इमिग्रेशन विभागाच्या मदतीने त्याचा मागोवा घेऊन अखेर विमानतळावर कारवाई करण्यात आली.
मुंब्रा ठाणे येथील सहआरोपी तन्वीर याकुब चौगुले याच्याविरुद्ध वापरलेल्या बँक खात्यांवरून महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, चंद्रपूर, नंदुरबार तसेच इतर राज्यांतून एकूण ९२ ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच तामिळनाडू राज्यातील Pudhukottai CB CID येथे भारतीय दंड संहिता तसेच इमिग्रेशन कायदा कलम अंतर्गत गुन्हे दाखल असून आरोपी परांगदा म्हणून नोंद झाली.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
सायबर पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जादा नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या ऑनलाईन जाहिरातींना बळी पडू नका. अनोळखी व्यक्तींना बँक खाते, एटीएम कार्ड, सिमकार्ड, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका. कमिशनच्या आमिषाने खाते उघडण्यास भाग पाडले जात असल्यास तत्काळ सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. आपल्या खात्याचा वापर करून गुन्हेगार इतर राज्यांतील लोकांची फसवणूक करू शकतात आणि नकळत आपणही आरोपी ठरू शकता, असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिला.
Contents
सोलापूर | २१.२ | रयत समाचार(World news) सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन यांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक करून मोठी कामगिरी बजावली. लाओस येथे वास्तव्यास राहून आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर रॅकेट चालवणारा ग्लेन (अल्बर्ट) पर्सी सिक्वेरा (वय ४७, रा. पलावा सिटी, डोंबिवली) याला लुक आऊट नोटीसच्या आधारे ९ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.(World news) २०२४ साली अंदाजे ६३ लाखांची गुंतवणूक फसवणूक सायबर पोलीस स्टेशन गुन्हा क्र. 04/2024 अन्वये भादंवि कलम 420, 419, 34 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (C) (D) अंतर्गत 4 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादींना ऑनलाईन संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये १० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यातून तब्बल ६२ लाख ६५ हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये व डिजिटल करन्सी (USDT) वॉलेटद्वारे वळवण्यात आले.(World news) तपासात खात्यांमध्ये AL Hareem Hajij Umrah Services खात्यात १६.६० लाख रूपये. Blackseed Solutions and Service खात्यात १०.३९ रूपये व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून ही रक्कम डिजिटल करन्सीद्वारे परदेशात ट्रान्सफर करण्यात आली.मुख्य आरोपी सिक्वेरा हा २०२२ पासून लाओस येथे वास्तव्यास होता. तेथे ‘टिचर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या चायनीज फसवणूकदारासोबत संगनमत करून विविध देशांतील युवकांना ऑफिस बॉय व डेटा एंट्री नोकरीच्या आमिषाने परदेशात बोलावले जात होते. परदेशात पोहोचल्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त करून जबरदस्तीने ऑनलाईन फसवणुकीचे काम करून घेतल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली.नोटीस बजावूनही आरोपी हजर न झाल्याने २०२४ मध्ये त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. इमिग्रेशन विभागाच्या मदतीने त्याचा मागोवा घेऊन अखेर विमानतळावर कारवाई करण्यात आली.मुंब्रा ठाणे येथील सहआरोपी तन्वीर याकुब चौगुले याच्याविरुद्ध वापरलेल्या बँक खात्यांवरून महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, चंद्रपूर, नंदुरबार तसेच इतर राज्यांतून एकूण ९२ ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच तामिळनाडू राज्यातील Pudhukottai CB CID येथे भारतीय दंड संहिता तसेच इमिग्रेशन कायदा कलम अंतर्गत गुन्हे दाखल असून आरोपी परांगदा म्हणून नोंद झाली.ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.सायबर पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जादा नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या ऑनलाईन जाहिरातींना बळी पडू नका. अनोळखी व्यक्तींना बँक खाते, एटीएम कार्ड, सिमकार्ड, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका. कमिशनच्या आमिषाने खाते उघडण्यास भाग पाडले जात असल्यास तत्काळ सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. आपल्या खात्याचा वापर करून गुन्हेगार इतर राज्यांतील लोकांची फसवणूक करू शकतात आणि नकळत आपणही आरोपी ठरू शकता, असा इशाराही यावेळी पोलिसांनी दिला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
