अहिल्यानगर | १७.११ | पंकज गुंदेचा
महाराष्ट्र प्रवर्तक परमपूज्य श्री कुंदनऋषिजी म सा यांच्या ९३व्या जन्मदिनानिमित्त अहिल्यानगर येथील आनंद नवकार परिवार ट्रस्टच्या वतीने जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्कार दिवाकर परमपूज्य श्री आलोकऋषिजी म सा यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी साध्वी परमपूज्य अनंतज्योतीजी म सा यांच्या सुशिष्या, आयंबिल आराधिका परमपूज्य अपूर्वज्योतीजी महाराज साहेब यांच्या १०८ आयंबिल तपस्येची पूर्णाहुती झाली. त्यांच्या तपश्चर्येबद्दल त्यांचा यथोचित सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
याच कार्यक्रमात समर्पण चातुर्मासाचे प्रमुख लाभार्थी सौरभजी बोरा तसेच चातुर्मास समितीचे अध्यक्ष अशोकजी ऊर्फ बाबूशेठ बोरा यांना समाजरत्न व समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र प्रवर्तक परमपूज्य श्री कुंदनऋषिजी म सा यांचे सुशिष्य परमपूज्य श्री आलोकऋषिजी म सा यांनी आपल्या गुरूंच्या संस्कार, शिक्षण, स्नेह, साधेपणा आणि जीवनमूल्यांविषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आनंद नवकार परिवार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “महाश्रमण महाराष्ट्र प्रवर्तक परमपूज्य श्री कुंदनऋषिजी म सा यांच्या व्यक्तिमत्त्वात संयम, साधना, सरलता, स्वाध्याय आणि गुरुभक्ती या गुणांचा सुंदर संगम आहे. आनंद पार्श्व गुरुकुलची स्थापना तसेच शाळेच्या इमारतीचे बांधकाम त्यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे आणि परमपूज्य श्री आलोकऋषिजी म सा यांच्या अथक परिश्रमामुळे साकार झाले आहे.”
संस्थेचे सचिव मनोजजी शेठिया यांनीही परमपूज्य श्री कुंदनऋषिजी म सा यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना सांगितले, “कुंदनऋषिजी म सा हे अहिल्यानगरसाठी एक मोठे संस्कारपीठ आणि ज्ञानपीठ आहेत. ते दररोज शेकडो भक्तांना प्रसन्नतेने मंगलपाठ ऐकवून आध्यात्मिक मार्गदर्शन करतात.”
कार्यक्रमास उपस्थित सर्व सदस्य, भाविक व भक्तगणांनी परमपूज्य श्री कुंदनऋषिजी म सा यांच्या ९३व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा व मंगलकामना व्यक्त केल्या.
कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


