World news | जागतिक वारसा दिन : एलिफंटा लेणींची 360° व्हर्च्युअल टूर; राज्यभर विविध कार्यक्रमांची मेजवानी

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipa Shirasath

मुंबई | १८.४ | रयत समाचार

(World news) आज ता. १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), मुंबई मंडळ यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या सहकार्याने एलिफंटा लेणींचा ऑन-साइट ३६० अंशांचा व्हर्च्युअल टॅपेस्ट्री टूर सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा अधिक सुलभ आणि जिवंत करण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे,अशी माहिती तेजस गर्गे यांनी दिली.

World news

(World news) या उपक्रमासोबतच राज्यातील विविध शासकीय वस्तुसंग्रहालये व विभागीय कार्यालयांमध्ये वारसा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

(World news) राज्यातील प्रमुख कार्यक्रमांचा आढावा : शासकीय वस्तुसंग्रहालये नागपूर (मध्यवर्ती संग्रहालय) – ASI नागपूर मंडळाच्या सहकार्याने वारसा स्थळांचे विशेष प्रदर्शन. सातारा (श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय) – अजिंक्यतारा किल्ल्यावर सकाळी ७ ते १० दरम्यान हेरिटेज वॉक. नाशिक (शासकीय संग्रहालय) – INHCRF यांच्या सहकार्याने हेरिटेज वॉक. छत्रपती संभाजीनगर संग्रहालय – ‘शिवगान’ संगीत कार्यक्रम, शिवकालीन गीतांचे सादरीकरण. सिंधखेडराजा संग्रहालय – क्रांतिवीरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन.
तर विभागीय कार्यालयांचे उपक्रम असे आहेत. रत्नागिरी विभाग – नांदोसगडी येथे हेरिटेज वॉक. पुणे विभाग – “वारशाची पुनर्कल्पना” या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्र व विशेष व्याख्यान. नाशिक विभाग – नाशिक सिटी हेरिटेज वॉक, अंजनेरी ट्रेल, वारसा प्रतिज्ञा व सांस्कृतिक सादरीकरण. छत्रपती संभाजीनगर विभाग – मराठा मिलिटरी लँडस्केप्सवर आधारित छायाचित्र प्रदर्शने व ‘शिवगान’ कार्यक्रम. नागपूर विभाग – भारतातील जागतिक वारसा स्थळांचे छायाचित्र प्रदर्शन.
डिजिटल आणि सांस्कृतिक वारशाचा संगम : एलिफंटा लेणींचा ३६०° व्हर्च्युअल टूर हा केवळ पर्यटन नव्हे तर डिजिटल वारसा जतन आणि जागतिक स्तरावर प्रसारासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. LiDAR व फोटोग्रामेट्रीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला हा टूर वारशाचे सूक्ष्म दस्तावेजीकरण करतो.
जागतिक वारसा दिनानिमित्त आयोजित हे उपक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, इतिहास, संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवणारा प्रयत्न आहे. राज्यातील विविध भागांमध्ये आयोजित कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये वारसा संवर्धनाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading