History | रायगड महादरवाजासाठी भव्य सुवर्णालंकारिक तोरण रवाना; शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक वैभवाची भर - Rayat Samachar

History | रायगड महादरवाजासाठी भव्य सुवर्णालंकारिक तोरण रवाना; शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक वैभवाची भर

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

कोल्हापूर | रयत समाचार

(History) ६ जून रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून रायगड किल्ल्याच्या महादरवाजासाठी कोल्हापूर येथे तयार करण्यात आलेले भव्य आणि आकर्षक ‘सुवर्ण अलंकारिक तोरण’ मोठ्या उत्साहात रायगडकडे रवाना करण्यात आले. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडप येथे या तोरणाचे विधिवत पूजन करण्यात आले.

- Advertisement -

(History) यावेळी श्रीमंत संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते धार्मिक विधी आणि पूजन सोहळा संपन्न झाला. शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वातावरण शिवमय झाले होते.

(History) विशेष म्हणजे, या सुवर्ण अलंकारिक तोरणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी निगडित विविध प्रतीके, श्री गणेशाची प्रतिमा, शुभचिन्हे आणि पारंपरिक कलाकुसर कोरण्यात आली आहे. या तोरणामुळे रायगडाच्या महादरवाज्याचे ऐतिहासिक वैभव अधिक खुलून दिसणार आहे.

पूजनानंतर ढोलताशांच्या गजरात, जय शिवरायच्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात हे तोरण रायगडकडे रवाना करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर होणाऱ्या सोहळ्यात या तोरणाचे विशेष आकर्षण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
रायगड हा स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असल्याने या सुवर्ण तोरणाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवप्रेमींसाठी ही घटना अभिमानास्पद ठरत असून, रायगडाच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading