अहमदनगर | ३०.६ | रयत समाचार
राज्यात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियान आज सोमवार (३० जून) पासून चालू झाले असून २१ जुलै २०२६ पर्यंत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. Voter List Revision पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने नागरिकांना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आणि बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन भारत निवडणूक आयोग यांनी केले.
हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
(Voter List Revision) निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, नागरिकांनी voters.eci.gov.in किंवा ECINet App वर जाऊन मागील मतदार यादीतील स्वतःचे किंवा आई-वडिलांचे नाव, मतदारसंघ, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक तपासून ठेवावा. घरभेटीदरम्यान बीएलओंकडून दिलेल्या गणना अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून स्वाक्षरी करून त्याची एक प्रत बीएलओंकडे जमा करावी, तसेच पोच घेऊन दुसरी प्रत स्वतःकडे ठेवावी.
(Voter List Revision) जर मागील मतदार यादीमध्ये स्वतःचे किंवा आई-वडिलांचे नाव नसेल, तर नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे. यामध्ये जन्माचा दाखला, पासपोर्ट, दहावीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमातील ओळखपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची कुटुंब नोंदवही, जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, १ जुलै १९८७ पूर्वीचे शासकीय ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. आधार कार्डही ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार आहे.
निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे की, कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि कोणतीही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, या उद्देशाने हे विशेष पुनरीक्षण अभियान राबविण्यात येत आहे.
नागरिकांनी बीएलओंना आवश्यक सहकार्य करून मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



