श्रीगोंदा | ५.६ | माधव बनसुडे
पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि भविष्यातील हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे प्रत्येक कुटुंबाला तब्बल १० आंब्याची रोपे मोफत वाटप करण्याचा Mango Plantation अभिनव उपक्रम राबविण्यात आला. Burckhardt Compression India Pvt. Ltd. यांच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) निधीतून आणि चिराग फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रोपांचा स्वीकार केला.
हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद
Mango Plantation अभियानाचे उदघाटन कंपनीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकुडझोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. संजय लाकुडझोडे पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाबा दरवडे, विलास पाटील लाकुडझोडे, माऊली लाकुडझोडे, निलेश धावडे, स्वप्निल चंदन आणि अनिल दरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब ढवळे (बाळू फिटर) यांच्या निवासस्थानी रोपांचे वितरण करण्यात आले. यापूर्वीच ग्रामस्थांना Mango Plantation लागवडीसाठी आवश्यक खड्डे तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे रोपे मिळताच त्यांची तातडीने लागवड करण्यात आली. प्रत्येक रोपाचे जिओग्राफिकल टॅगिंग करण्यात येणार असल्याने त्यांच्या संगोपनावर प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
रोपांची लागवड शास्त्रोक्त पद्धतीने व्हावी यासाठी नर्सरीतील तज्ज्ञांनी ग्रामस्थांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. खड्ड्यांची तयारी, योग्य लागवड पद्धती, खतांचा वापर, पाणी व्यवस्थापन तसेच लागवडीनंतरची देखभाल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे रोपे केवळ लावली जाणार नसून त्यांचे संवर्धनही प्रभावीपणे होणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच बापूसाहेब ढवळे, गणेश लाकुडझोडे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. यापूर्वीही CSR निधीतून गावात विविध विकासकामे करण्यात आली असून, आता प्रत्येक कुटुंबापर्यंत आंब्याची रोपे पोहोचवून हरित उखलगाव घडविण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यात आला आहे.
‘एक कुटुंब, दहा झाडे – हिरवेगार, समृद्ध उखलगाव’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. भविष्यात गाव अधिक हिरवेगार होण्याबरोबरच आंब्याच्या झाडांमधून ग्रामस्थांना आर्थिक लाभही मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श ठरणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Image Alt Text:
Mango Plantation Ukhalgaon villagers receiving free mango saplings under the One Family Ten Trees campaign
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


