Ideal Sarpanch Award | देहरेच्या विकासकामांची राज्यभर दखल; सरपंच शितल चोर यांना 'आदर्श सरपंच सन्मान 2026' - Rayat SamacharIdeal Sarpanch Award देहरेच्या शितल चोर यांना राज्यस्तरीय 'आदर्श सरपंच सन्मान २०२६'

Ideal Sarpanch Award | देहरेच्या विकासकामांची राज्यभर दखल; सरपंच शितल चोर यांना ‘आदर्श सरपंच सन्मान 2026’

लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक कारभार आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्याची गौरवपूर्ण नोंद

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
राज्यस्तरीय 'आदर्श सरपंच सन्मान २०२६' स्वीकारताना सरपंच सौ. शितल आण्णासाहेब चोरSubEditor | Dipak Shirasath

नगर तालुका | ५.७ | राहुल जाधव

(Ideal Sarpanch Award) तालुक्यातील देहरे ग्रामपंचायतीच्या लोकाभिमुख, विकासाभिमुख आणि पारदर्शक कार्याची राज्यस्तरावर दखल घेत सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आदर्श सरपंच सन्मान २०२६’ हा पुरस्कार देहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच शितल आण्णासाहेब चोर यांना प्रदान करण्यात आला.

(Ideal Sarpanch Award) गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी नियोजन, स्वच्छता अभियानाची यशस्वी अंमलबजावणी, ग्रामस्थांचा विकासकामांमधील सक्रिय सहभाग, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन तसेच महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.

(Ideal Sarpanch Award) सन्मानपत्रात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामीण विकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न, ग्रामपंचायतीचे सुयोग्य नियोजन, लोकाभिमुख प्रशासन आणि गावाच्या प्रगतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे शितल चोर यांनी देहरे ग्रामपंचायतीची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गावात अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे देहरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शितल आण्णासाहेब चोर यांचे अभिनंदन केले. भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे कार्य अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

‘आपले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे’ या भावनेतून प्राप्त झालेला हा सन्मान संपूर्ण देहरे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

यावेळी बाबासाहेब गायकवाड, रमेश काळे पाटील, बापूसाहेब चोर, भाऊसाहेब रामराव काळे, विजय लांडगे, मेघनाथ धनवटे, अण्णासाहेब चोर, संजय शिंदे, भानुदास भगत, योगेश कटारे, राहुल जाधव, बबन बंगे, रवी पाखरे, ग्रामविकास अधिकारी कृष्णा बडे आदी उपस्थित होते.

Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading