नंदूरबार | २.७ | रयत समाचार
अतीदुर्गम आदिवासी भागातील दापूर (ता. नवापूर, जि. नंदूरबार) हे गाव लोकसहभागातून आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी लोकसहभागी सर्वसमावेशक ग्रामीण समिक्षा (PRA) राबविण्याचा भावनिक निर्धार महाराष्ट्र राज्य प्रविण प्रशिक्षक संघटनेच्या सर्व सहभागी प्रशिक्षकांनी व्यक्त केला. ‘ब्रेनस्टॉर्मिंग’ Brainstorming Workshop प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपावेळी हा संकल्प करण्यात आला.
प्रशिक्षक विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रविण प्रशिक्षक संघटनेतर्फे आयोजित Brainstorming Workshop कार्यशाळेत राज्याध्यक्ष अशोक सब्बन बोलत होते. यावेळी ते म्हणाले, प्रविण प्रशिक्षक समाजाच्या ज्ञान, कौशल्य आणि वर्तनामध्ये विकासात्मक परिवर्तन घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. त्यासाठी प्रशिक्षकांकडे ज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञानाचा वापर, प्रभावी संवाद आणि उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. अशा सक्षम प्रशिक्षकांची निर्मिती ब्रेनस्टॉर्मिंगसारख्या कार्यशाळांमधून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
दापूरचे माजी सैनिक तथा सरपंच जयराम कुंवर यांनी आदर्श गावाच्या संकल्पनेतून Brainstorming Workshop आयोजित करून सहकार्य केले. कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सॉबी फ्रान्सिस आणि दामले सर यांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पाटील आणि मंगल मोरे यांनी प्रशिक्षकांशी संवाद साधत प्रशिक्षणाची उद्दिष्टे स्पष्ट केली. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ रजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेत महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती आणि त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
समारोपावेळी सर्व प्रशिक्षकांनी दापूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली लोकसहभागी सर्वसमावेशक ग्रामीण समिक्षा (Participatory Rural Appraisal – PRA) करण्याचा तसेच ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्थांसोबत सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला.
Crime | रस्ता ‘चोरी’ला गेला ? नागरिकांना माहिती असावी मनपाच्या ‘ताब्यातील रस्त्यांची नोंदवही’
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



