रोम |२१.६ | वृत्तसंस्था
(Trump Meloni) G7 शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे इटली आणि अमेरिकेदरम्यान नव्या राजनैतिक वादाला तोंड फुटले आहे. ट्रम्प यांनी एका इटालियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी ‘विनवण्या केल्या’ असल्याचा दावा केला.
(Trump Meloni) रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इटालियन वृत्तवाहिनी LA7 ने प्रसिद्ध केलेल्या भाषांतरात ट्रम्प म्हणाले, तिने माझ्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. मी सहसा फोटो काढत नाही, पण तिची दया आली म्हणून मी फोटो काढला.
(Trump Meloni) या वक्तव्यामुळे इटलीत तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर करत ट्रम्प यांच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
मेलोनी म्हणाल्या, डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य पूर्णपणे मनगढंत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या सहयोगी देशांशी असा व्यवहार का करतात, हे मला समजत नाही. ही पहिली वेळ नाही. मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ना मी आणि ना इटली कोणाची ‘मैत्रीण’ म्हणून वागत नाही.
मेलोनी यांच्या या प्रतिक्रियेनंतर दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, G7 परिषदेनंतर निर्माण झालेला हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरला.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.




