अहमदनगर | १९ एप्रिल | प्रतिनिधी
(Sports) येथील खेळाडू शुभांगी सुधाकरराव रोकडे यांना सन २०२२- २३ वर्षाचा धनुर्विद्या खेळाच्या प्रकारातील जिजामाता राज्य क्रिडा पुरस्कार, कोमल नारायण वाकळे यांना वेटलिफ्टींग प्रकारात सन २०२२ -२३ वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार, कबड्डी खेळातील यशस्वीतेबद्दल अस्लम इनामदार आणि शंकर भिमराज गदई यांना २०२३-२४ वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार देवून राज्य सरकारने सन्मानित केले आहे.
(Sports) या खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सन्मान करून अभिनंदन करण्यात आले. एकाचवेळी चार खेळाडूचा राज्यस्तरावर झालेला सन्मान जिल्ह्याच्या क्रिडाक्षेत्राचा नावलौकीक वाढविणारा असून, क्रिडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक वाढला आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770




