Shrigonda Scholarship | शिष्यवृत्ती परीक्षेत कन्या विद्यालयाची दैदिप्यमान भरारी; राज्य गुणवत्ता यादीत स्वरांजली भगत 14 वी - Rayat SamacharShrigonda Scholarship शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीगोंदा कन्या विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी; राज्य गुणवत्ता यादीत स्वरांजली भगत १४ वी

Shrigonda Scholarship | शिष्यवृत्ती परीक्षेत कन्या विद्यालयाची दैदिप्यमान भरारी; राज्य गुणवत्ता यादीत स्वरांजली भगत 14 वी

पाचवीत उत्तर विभागात द्वितीय, आठवीत तृतीय

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या श्रीगोंदा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनीSubEditor | Dipak Shirasath

श्रीगोंदा | ६.७ | माधव बनसुडे

(Shrigonda Scholarship) रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाने २०२६ च्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाने उत्तर विभागात इयत्ता पाचवीमध्ये द्वितीय, तर इयत्ता आठवीमध्ये तृतीय क्रमांक पटकावत शैक्षणिक क्षेत्रातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.

(Shrigonda Scholarship) इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यालयातील १०४ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी १३ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्या असून ६९ विद्यार्थिनी पात्र ठरल्या. विद्यालयाचा निकाल ६६.३३ टक्के लागला.

Shrigonda Scholarship शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींसह श्रीगोंदा कन्या विद्यालय

(Shrigonda Scholarship) शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींमध्ये भूमी दादा साळुंके (२४६), सान्वी सुधीर साबळे (२३८), सृष्टी काकासाहेब खोसे (२२४), श्रावणी उद्धव दिंडे (२२२), आरोही शरद तरटे (२२०), वैष्णवी रमेश हराळ (२२०), अनन्या चंद्रशेखर उदार (२१८), वृंदावणी पद्माकर गिरमकर (२१०), शुभ्रा हंबीर म्हस्के (२०८), प्राची अजित बोरुडे (२०६), सलिहा जुबेर पठाण (२०६), वेदिका गणेश शेंडगे (२०६) आणि अनन्या प्रसाद शिंदे (२०४) यांचा समावेश आहे.

या विद्यार्थिनींना मराठी विषयासाठी एस.डी. राऊत, गणितासाठी विभागप्रमुख एस.व्ही. वाघचौरे, इंग्रजीसाठी पी.बी. घोडे आणि बुद्धिमत्ता विषयासाठी एस.जी. गारुडकर यांनी मार्गदर्शन केले.

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचा ५२.९ टक्के निकाल लागला असून १३ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, स्वरांजली संदीप भगत हिने २७४ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत १४ वा क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

हो ही वाचा : Ram Mandir Donation | मंदिरच सुरक्षित नाहीत तर आस्था कुठे सुरक्षित?; राममंदिर देणगी चोरीवर शंकराचार्यांचा संतप्त सवाल

- Advertisement -
याशिवाय समृद्धी सचिन शेळके (२६८), नीता नितीन सप्रे (२६४), श्राव्या मच्छिंद्रनाथ लोखंडे (२६२), मयुरी लहू गांगर्डे (२६०), प्राची महेश खोत (२५४), आराध्या अमोल गांगर्डे (२५२), भार्गवी योगेश शेलार (२५२), समीक्षा संतोष शिंदे (२४८), तनिष्का संदीप राऊत (२३२), समीक्षा संतोष टकले (२२८), स्पंदन विजय वांगणे (२२६) आणि परिनीती विक्रम वाघ (२२४) यांनीही शिष्यवृत्ती मिळवत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला.

या विद्यार्थिनींना मराठी विषयासाठी के.डी. शिंदे, गणितासाठी विभागप्रमुख के.जी. खामकर, इंग्रजीसाठी डी.सी. खेडकर आणि बुद्धिमत्ता विषयासाठी एस.एस. कळसकर यांनी मार्गदर्शन केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडके, स्कूल कमिटी सदस्य ज्योत्स्ना भंडारी व अश्विनी रणशिंग, प्राचार्य दिलीपराव भुजबळ, मुख्याध्यापिका वर्षा भोईटे, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, गुरुकुल प्रमुख किरण शिंदे, संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

Public issue | तासन्‌तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात?

 

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading