श्रीगोंदा |१३ फेब्रुवारी | माधव बनसुडे
(Women) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत महसूल सहाय्यकपदी (Revenue Assistent) जास्मिन व लैला इनामदार या दोघी सख्ख्या बहिनींनी बाजी मारली. त्यांनी अतिशय खडतर प्रवास करून घवघवीत यश संपादन केले. शेतकरी कुटुंबातील मुलींनी मिळविलेल्या दैदिप्यमान यशामुळे श्रीगोंद्याच्या नावलौकिकात भर पडली.
(Women) श्रीगोंदा तालुक्यातील पेडगांव येथील हमिदा व यासिन जानमहंमद इनामदार या शेतकरी दांपत्याच्या कन्या असून हलाखीच्या परिस्थितीतून मुलाप्रमाणे मुलींनाही शिक्षणासाठी आई हमिदा यांनी मुले-मुली एकसमान मानत, मुलगा-मुलगी भेदभाव न करता गरीब परस्थितीतून मुलींना शिक्षण दिले. त्यांच्या या आधारस्तंभामुळे लेकरांनी यश संपादन केले. आईवडिल व त्यांच्या बहिणींनी घेतलेल्या कष्टामुळे या दोघींना यश संपादन करण्यासाठी मदत मिळाली.

हमिदा व यासिन इनामदार यांनी आपल्या सर्वच मुलींना शिक्षणात कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या कन्या रुबीना व निलोफर इनामदार या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षका, हिना या आयटी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात कार्यरत आहेत. तर नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षेमध्ये जास्मिन व लैला इनामदार या दोन्ही सख्या बहिणींची भर पडली आहे. त्यांच्या कर्तुत्वामुळे सर्वत्र आईवडिलांसह त्यांचे कौतुक, अभिनंदन होत आहे.
हे ही वाचा : ‘राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान’ सरफराज अहमद यांचे आवर्जून वाचावे असे नवे पुस्तक – किशोर मांदळे