शेवगाव | १ जुलै | शिवाजी घुगे
(Sandeep Motkar Award) तालुक्यातील घोटण येथील प्रगतशील शेतकरी ॲड. संदीप बबन मोटकर यांना सेंद्रिय शेतीक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र राज्य कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्हा परिषद येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
(Sandeep Motkar Award) ॲड. मोटकर यांनी आपल्या शेतीमध्ये ऑरगॅनिक फार्मिंगचा अवलंब करून पारंपरिक पीक पद्धतीत आमूलाग्र बदल केला. रासायनिक खतांचा वापर टाळत सेंद्रिय शेती, विद्राव्य सेंद्रिय स्लरी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्यांनी विविध पिकांमध्ये यशस्वी फेरबदल केला. त्यांच्या या प्रयोगांमुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत झाल्याचे दिसून आले.
हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
(Sandeep Motkar Award) सेंद्रिय शेतीमुळे मिळालेल्या सकारात्मक परिणामांचा उल्लेख करत, भविष्यातही पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्धार ॲड. मोटकर यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातील शेतकरी, नागरिक आणि विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


