नगर तालुका | ०१.७ | रयत समाचार
Nepti: नगर तालुक्यातील नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव राजेंद्र खुंटाळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. अनेक वर्षे प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देत केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी ग्रामस्थांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर आणि सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन राजेंद्र खुंटाळे यांचा सन्मान करण्यात आला. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी दिली.
हे ही वाचा : Public issue | तासन्तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात?
नेप्ती सेवा सोसायटीची आर्थिक शिस्त, सभासदांचा विश्वास, कर्जवाटपातील पारदर्शकता आणि विकासाभिमुख निर्णय यांमुळे संस्थेला वेगळी ओळख मिळाली असून त्यामध्ये राजेंद्र खुंटाळे यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे मत माजी सरपंच संजय जपकर यांनी व्यक्त केले.
संजय जपकर म्हणाले, “आज खुंटाळे सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी निर्माण केलेली कार्यसंस्कृती आणि विकासाचा वारसा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कोणतीही संस्था केवळ इमारतींमुळे मोठी होत नाही, तर त्यामागे निष्ठेने काम करणारी माणसे असतात. राजेंद्र खुंटाळे हे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या सेवेमुळे नेप्ती सेवा सोसायटीने प्रगतीची अनेक टप्पे गाठले असून त्यांचे योगदान ग्रामस्थ कधीही विसरणार नाहीत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो.”
सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “राजेंद्र खुंटाळे यांनी सेवाकाळात सभासदांना आपलेपणाने मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येक काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पूर्ण केले. त्यांच्या कार्यामुळे सोसायटीची विश्वासार्हता अधिक वाढली. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा अनुभव समाजाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल.”
हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद
सत्काराला उत्तर देताना राजेंद्र खुंटाळे यांनी ग्रामस्थ, सभासद, संचालक मंडळ आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांच्या विश्वासामुळेच जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता आल्या, असे सांगत त्यांनी मिळालेला सन्मान आयुष्यभर जपून ठेवणारी अमूल्य आठवण असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक गजेंद्र क्षीरसागर, माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, ग्रामसेवक प्रवीण पानसंबळ, माजी उपसरपंच बाबासाहेब होळकर, दादू चौगुले, बंडू जपकर, चेअरमन सुरेंद्र होळकर, व्हाईस चेअरमन सादिक पवार, संचालक जालिंदर शिंदे, उमर सय्यद, अंबादास जपकर, राजेंद्र जपकर, सुरेश कदम, राजाराम जपकर, भाऊसाहेब होळकर, अशोक जपकर, मुक्ता कांडेकर, विलास जपकर, मच्छिंद्र होळकर, भास्कर जपकर, शांताबाई जपकर, जमीर सय्यद, अमोल चौगुले, माजी सचिव अशोक होळकर, रामराव कांडेकर यांच्यासह ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण होते. उपस्थितांनी राजेंद्र खुंटाळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्याचा आदर्श भावी पिढीने घ्यावा, अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


