Rip news | कॉम्रेड सुभाष थोरात यांना अखेरचा निरोप; लढवय्या कार्यकर्त्याला लाल सलाम

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

पुणे | २६ जून | प्रतिनिधी

(Rip news) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, कवी, लेखक, समीक्षक आणि ‘जीवनमार्ग’ मासिकाच्या संपादक मंडळाचे सक्रिय सदस्य असलेले कॉम्रेड सुभाष थोरात यांचे काल दु:खद निधन झाले. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दीर्घकाळ झुंज देत गुरुवारी ता.२६ जून रोजी दुपारी ११.५० वाजता त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.

 

(Rip news) सायंकाळी ७.२० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी दुपारी ६ वाजता त्यांचे पार्थिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ‘लाल सलाम’ करत, त्यांच्या पार्थिवावर पक्षाचा झेंडा अर्पण केला.

 

(Rip news) कॉ. सुभाष थोरात यांच्या अंत्ययात्रेला डाव्या, आंबेडकरवादी, समाजवादी आणि विविध पुरोगामी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते, कवी, लेखक, कलावंत, विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. “कॉम्रेड सुभाष थोरात अमर रहे!”, “जय भीम-लाल सलाम!”, “वर्गअंत-जातीअंत होके रहेगा!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

 

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. विवेक मॉन्टेरो, कॉ. हेमकांत सामंत, कॉ. सुबोध मोरे, डॉ. श्रीधर पवार, कॉ. प्रा.डॉ. महेबुब सय्यद, कॉ. प्राची हातिवलेकर, कॉ. नसीमा शेख, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भालचंद्र कांगो, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. जयदेव गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे राजू कोरडे, लाल निशाण पक्षाच्या मेधा थत्ते यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

कॉम्रेड सुभाष थोरात यांच्या जाण्याने सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील एक निष्ठावान, संवेदनशील आणि लढवय्या कार्यकर्त्याचा अंत झाला आहे. त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल, अशी भावना विविध क्षेत्रातील सहकाऱ्यांनी व्यक्त केली.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading