बारामती | ३१.३ | रयत समाचार
(Election) बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नेतात सुभाषचंद्र बोस यांच्या अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक (AIFB) पक्षाने उमेदवारी जाहीर करत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष किशोर कर्डक यांनी ही घोषणा केली.
(Election) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्रातील परंपरेनुसार अशा निवडणुका बिनविरोध होतात, मात्र यावेळी फॉरवर्ड ब्लॉकने वेगळी भूमिका घेतली आहे.
(Election) किशोर कर्डक यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून ‘विचारांच्या लढाई’साठी लढवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचे मान्य करत त्यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा आदरही व्यक्त केला.
मात्र, गेल्या १२ वर्षांत राज्य आणि देशात वाढलेल्या धार्मिक व जातीय तणावाविरोधात आवाज उठवण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. विविध सामाजिक, राजकीय आणि कायदा- सुव्यवस्थेच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
तसेच, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण व आरोग्य खर्चातील वाढ, उद्योगांचे स्थलांतर आणि रिक्त सरकारी पदे यांसारख्या मुद्द्यांवरही त्यांनी लक्ष वेधले. अजितदादा पवार यांच्या निधनाबाबत उपस्थित झालेल्या संशयांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत पारदर्शक चौकशीची मागणी केली.
फॉरवर्ड ब्लॉक पक्ष हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा असून, सामाजिक न्याय, समता आणि तडजोडविहीन संघर्ष ही त्यांची भूमिका असल्याचे कर्डक यांनी नमूद केले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
