मुंबई | २७ जून | प्रतिनिधी
(World news) अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबईस्थित इराण दूतावासाला भेट दिली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने इराणचे राजदूत मोहीसीनी फर्द यांच्याशी सविस्तर चर्चा केली व भारतातील जनतेच्या सहवेदनेचा संदेश दिला.
(World news) शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, इप्टाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. चारुल जोशी, मुंबई महापालिका कामगार युनियन (AITUC) चे प्रतिनिधी कॉ. विजय दळवी, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे कॉ. आमिर काझी तसेच ‘हम भारत के लोग’ या संघटनेचे फिरोज मिठीबोरवाला सहभागी होते.
(World news) शिष्टमंडळाने अमेरिकेच्या आक्रमक धोरणांचा निषेध करत जागतिक शांतता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी भारतातील लोकशाहीवादी आणि प्रगतीशील शक्ती इराणच्या बाजूने असल्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी इराण राजदूतांनी भारतातील जनतेच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अमेरिका-इराण संघर्षात अमेरिका चालवत असलेल्या दडपशाही व युद्धजन्य कारवायांचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, या कृतीमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण होत असल्याचा इशारा दिला आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.