पाथर्डी | पंकज गुंदेचा
Appasaheb Rajale Patil: न्यू इंग्लिश स्कूल, आदिनाथनगर येथे लोकनेते आप्पासाहेब राजळे पाटील काका यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा, गरजू व निराधार विद्यार्थ्यांना खेळाडू गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊवाटप तसेच निमंत्रितांचे कवी संमेलन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती पाथर्डीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड होते. प्रमुख पाहुणे म्हणून वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक नितीन शिंदे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव भास्करराव गोरे, संस्थेचे निरीक्षक तथा माजी मुख्याध्यापक भाऊसाहेब आठरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयातील बाळासाहेब राजळे सर, कराळे सर, रामेश्वर राजळे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक काळे यांनी केले.
कार्यक्रमातील कवी संमेलनाला ज्येष्ठ कवी बाळासाहेब कोठुळे यांनी सूत्रसंचालन करत रंगत आणली. यावेळी रूपचंद शिदोरे, शेवाळे, राजेंद्र उदारे, सचिन चव्हाण, संदीप काळे, अमोल जाधव आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या. विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही कवी संमेलनात सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
आप्पासाहेब राजळे पाटील काका यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील सहशिक्षक राजीव सुरवसे यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश आणि खाऊवाटपाचा उपक्रम आयोजित केला.
यावेळी अशोक पवार, शिवाजी वाघमारे सर, सुरेश कराळे सर, काकडे सर, गरड सर, अनिल कचरे सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद गायकवाड सर, प्रशांत राजळे, जवणे मॅडम, जेधे मॅडम आणि चितळे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


