औरंगाबाद | १९ जून | प्रतिनिधी
(History) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले मिलिंद महाविद्यालय आज आपल्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करून ७५ वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण करत आहे. या ऐतिहासिक क्षणाचा समारोप सोहळा आज उत्साहात पार पडला, अशी माहिती प्रा.डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी दिली.

(History) गोणारकर पुढे म्हणाले, १९ जून १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते स्थापन झालेलं हे महाविद्यालय, मराठवाड्यातील उच्च शिक्षणाचा पाया घालणारे एक क्रांतिकारी पाऊल ठरले. या संस्थेच्या पाठीमागे असलेली शैक्षणिक क्रांती ही डॉ. बाबासाहेबांच्या समतेच्या तत्त्वज्ञानाची मूर्त रूप आहे.
(History) मिलिंद महाविद्यालयातून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती झाली, ही बाब या महाविद्यालयाच्या ऐतिहासिक आणि बौद्धिक वारशाची साक्ष देणारी आहे. या संस्थेने शिक्षणाबरोबरच संस्कार, सामाजिक न्याय आणि समतेचे मूल्य जपले असून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली आहे.
समारोप सोहळ्यास प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, सर्व प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे मन:पूर्वक अभिनंदन करताना, अनेक मान्यवरांनी महाविद्यालयाच्या योगदानाची प्रशंसा केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता


