World news | ‘नेणीवेचा डोह’राज्यस्तरीय साहित्य संमेलन; महाकवी गायधनींच्या विचारांना अभिवादन

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ३.५ | गुरूदत्त वाकदेकर

(World news) येथील शुभंकरोती साहित्य परिवार आणि नॅशनल लायब्ररी, वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल लायब्ररी येथे ता. १६ मे रोजी ५ व्या ‘नेणीवेचा डोह’ राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. महाकवी सुधाकर गायधनी यांच्या ‘नेणीवेचा डोह’ या जगभर गाजलेल्या काव्यविषयक चिंतनपर लेखाचेच नाव यावेळी या संमेलनाला देण्यात आले असून, त्यांच्या साहित्यिक विचारांना अभिवादन करण्याचा हा विशेष प्रयत्न आहे.

(World news) यावेळी ‘नेणीवेचा डोह’ या लेखाच्या अभिवाचनाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाच्या आयोजिका व कवयित्री सोनाली जगताप, डॉ. मनोज वराडे हे या लेखाचे अभिवाचन करतील.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान कवयित्री तसेच कुसुमाई प्रकाशनाच्या डॉ. मंजूषा सावरकर भूषवणार आहेत.

(World news) राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अ.भा.म.सा.संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ. सदानंद मोरे यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार व कवयित्री मिनाक्षी पाटील, सचिव, साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले असून, प्रा. विसूभाऊ बापट यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
साहित्यप्रेमींसाठी ‘नेणीवेचा डोह’ या संमेलनाच्या माध्यमातून एक समृद्ध साहित्यिक पर्व अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading