Ad imageAd image

Education | बाबासाहेबांच्या स्वप्नांना न्याय कधी ? पीईएस शैक्षणिक वारसा वाचवा

आंबेडकरी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

छत्रपती संभाजीनगर | ९.६ | रयत समाचार

(Education) ज्या विटांनी आपल्या बापजाद्यांना आणि आपल्याला समाजात ताठ मानेने जगण्याचे, स्वाभिमानाचे छत मिळवून दिले, आज त्याच विटांना आपल्या एकजुटीच्या आधाराची गरज आहे, या भावनिक शब्दांत Save P.E.S. म्हणजेच Protect Our Heritage अभियानाच्या वतीने आंबेडकरी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

(Education) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनाच्या पवित्र भूमीत स्वतः उभे राहून, एकेक वीट रचून शिक्षणाचा हा ज्ञानगड उभारला. समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याची ताकद मिळावी, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यातून उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था आणि वास्तू आज लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

(Education) मात्र आज हाच ऐतिहासिक वारसा संकटात सापडल्याची भावना व्यक्त होत असून, या संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या शैक्षणिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी सर्व आंबेडकरी समाजाने मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले.
हा केवळ एका संस्थेचा प्रश्न नाही, तर बाबासाहेबांच्या विचारांचा, त्यांच्या शैक्षणिक क्रांतीचा आणि आपल्या स्वाभिमानाच्या इतिहासाचा प्रश्न आहे, असे अभियानाच्या वतीने नमूद करण्यात आले. नागसेनवनातील हा वारसा जपणे ही प्रत्येक आंबेडकर अनुयायाची नैतिक जबाबदारी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
संस्थेच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेला व्यापक पाठिंबा देण्याचे आवाहन करत, बाबासाहेबांच्या स्वप्नातील या ज्ञानमंदिराला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व स्तरांतून एकजूट आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading