Ad imageAd image

World news | FTII चा ऐतिहासिक टप्पा; BAFTA Student Awards च्या लाँगलिस्टमध्ये ‘विय्युरिंटे नाधन’

भारतीय चित्रपट शिक्षणक्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | ९.६ | रयत समाचार

(World news) भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेसाठी (FTII) अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी करत ‘Viyyurinte Naadhan (Lord of Viyyur)’ या संवादप्रधान चित्रपटाची BAFTA Student Awards 2026 च्या लाँगलिस्टमध्ये निवड झाली. विशेष म्हणजे, BAFTA Student Awards च्या इतिहासात प्रथमच FTII च्या चित्रपटाला लाँगलिस्टमध्ये स्थान मिळाले असून, संस्थेसाठी हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

(World news) Film Wing 2022 बॅचमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पटकथा अमल पी.व्ही. यांनी केले. चित्रपटाच्या यशामागे विद्यार्थ्यांच्या सामूहिक सर्जनशीलतेचा मोठा वाटा असून, या टीममध्ये छायांकन मोहम्मद अस्लम, संपादन तथागत यादव, कला दिग्दर्शन आलिया राबिया अझीझ आणि ध्वनी संकल्पना के. जयसूर्या सुरेश यांनी सांभाळले.

(World news) चित्रपटाची BAFTA Student Awards 2026 च्या लाँगलिस्टमध्ये निवड झाल्याने FTII विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचे मानले जात आहे. अंतिम नामांकनांसाठी आता सर्वांचे लक्ष लागले असून, भारतीय चित्रपट शिक्षण क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी ठरत आहे. FTII कडून या यशाबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले असून, अंतिम फेरीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात.
FTII ते BAFTA हा प्रवास आता भारतीय विद्यार्थी चित्रपटांसाठी नव्या शक्यता उघडणारा ठरत असल्याची चर्चा चित्रपट क्षेत्रात सुरू झाली.

india news | अहमदनगरमधे शिक्षणाचे 1 ले बीज लावणारी ‘अमेरिकन मराठी मिशनरी’ – कामिल पारखे


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading