कोल्हापूर | ९.६ | रयत समाचार
(Social) राज्यात विविध ठिकाणी आढळणाऱ्या ‘तिलारी’ किंवा ‘तिल्लोरी कुणबी’ नोंदींचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी मराठा समाजबांधवांना जाहीर आवाहन केले. आपल्या परिसरात, कुटुंबात किंवा जुने दस्तऐवज, सातबारा, शैक्षणिक दाखले, वंशावळी अथवा इतर शासकीय कागदपत्रांमध्ये ‘तिलारी’ किंवा ‘तिल्लोरी कुणबी’ अशा नोंदी असल्यास त्यांची प्रत उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
(Social) रुपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात अशा प्रकारच्या शंभरपेक्षा अधिक नोंदी आढळून आल्या असून, कोकण आणि विदर्भ विभागातही ‘तिलारी’ किंवा ‘तिल्लोरी कुणबी’ स्वरूपाच्या नोंदी अस्तित्वात असल्याचे समोर येत आहे. या नोंदींचा अभ्यास, संदर्भ संकलन आणि ऐतिहासिक माहिती एकत्र करण्यासाठी राज्यभरातून माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले.
(Social) विशेषतः कोकण, मराठवाडा आणि इतर भागातील मराठा बांधवांनी आपल्या परिसरात किंवा स्वतःच्या कुटुंबातील अशा प्रकारच्या नोंदी असल्यास पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ अधिक मजबूत करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी उपलब्ध असलेली कागदपत्रे, पुरावे आणि नोंदी पुढे आणाव्यात, असे रुपेश पाटील यांनी म्हटले आहे. अधिक माहितीसाठी रुपेश पाटील यांना 9096614646 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Public issue | तासन्तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

