Education | शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू; प्राचार्य एस.बी. गोतपागर यांचे आवाहन

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

रयत समाचार 

मुंबई | १२.५ | गुरुदत्त वाकदेकर

(Education) दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. स्वातंत्र्य सेनानी जोसेफ (काका) बापटिस्टा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी येथे ऑगस्ट २०२६ प्रवेश सत्रासाठी विविध रोजगाराभिमुख व्यवसायांमध्ये प्रवेशासाठी जागा उपलब्ध असल्याची माहिती संस्थेमार्फत देण्यात आली.

(Education) यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत वूड वर्क टेक्निशियन (कारपेंटर), वेल्डर, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (दिव्यांगांसाठी), इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, वायरमन आणि मेकॅनिक मोटर व्हेईकल या विविध तांत्रिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला.

काही व्यवसायांसाठी दहावी उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. काही तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी दहावीसह विज्ञान आणि गणित विषयाची अट लागू करण्यात आली.

(Education) प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश संकेतस्थळ https://admission.dvet.gov.in येथे ऑनलाईन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम अर्जाची प्रत, दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) तसेच नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेला चालना देणारे हे अभ्यासक्रम तांत्रिक शिक्षणासोबत रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणार आहेत. दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.बी. गोतपागर यांनी केले.
अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळ https://admission.dvet.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading