मुंबई | ३.३ | रयत समाचार
(Culture) बॉलिवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी यंदाची होळी अत्यंत उत्साहात आणि रंगतदार वातावरणात साजरी केली. पांढऱ्या पारंपरिक वेशात रंगांच्या उधळणीत न्हाऊन निघालेल्या ऊर्मिलांच्या छायाचित्रांनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
(Culture) कुटुंबीय आणि जिवलग मित्रमंडळींसोबत त्यांनी रंगांची उधळण करत आनंद साजरा केला. काही छायाचित्रांत त्या ज्येष्ठ सदस्यांसोबत प्रेमळ क्षण शेअर करताना दिसतात, तर काही ठिकाणी मैत्रिणीं सोबत सेल्फी घेताना त्यांचा उत्साही अंदाज पाहायला मिळतो. सर्वांच्या चेहऱ्यावर गुलालाचे रंग आणि आनंदी हास्य झळकत होते.
ऊर्मिला यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, Happy Holi Beautiful people. May your lives be blessed in beautiful colours always. होली की शुभकामनाएँ.”
(Culture) त्यांच्या या शुभेच्छांना चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पारंपरिक पांढऱ्या कपड्यांवर उधळलेले लाल, गुलाबी आणि पिवळे रंग हा उत्सव अधिकच आकर्षक बनवत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊर्मिला मातोंडकर यांनी साधेपणात आणि आपुलकीतून होळीचा आनंद साजरा केल्याचे या छायाचित्रांतून स्पष्ट दिसते.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.







