मुंबई | २२.३ | रयत समाचार
(Women) भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ऑस्कर’ अकॅडमी पुरस्काराने गौरविलेल्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथैय्या यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्यासाठी ‘भानू अथैय्या : साधनेतून सन्मानाकडे’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवारी ता. २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
(Women) या कार्यक्रमामध्ये गीत, संगीत, नृत्य, दृकश्राव्य सादरीकरण आणि निवेदनाच्या माध्यमातून भानू अथैय्या यांच्या कलाप्रवासाचा आणि त्यांच्या यशोगाथेचा उलगडा करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणाऱ्या त्यांच्या योगदानाचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे.
(Women) सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून मुंबई व परिसरातील नागरिक, कलाकार आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे ही पहा : शाहू मोडक यांची मुलाखत
Womens Power: वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


